योगी आदित्यनाथ यांनी घेतली उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Email This Post

योगी आदित्यनाथ यांनी आज दुपारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. काल योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. योगी उत्तर प्रदेशचे 21वें मुख्यमंत्री झाले आहेत. यावेळी बीजेपी प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. लखनऊचे महापौर डॉ. दिनेश शर्मा यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दिनेश शर्मा पीएम मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

योगी यांच्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये सर्वात आधी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ सूर्य प्रताप साही यांनी घेतली.ते पथरदेवा मतदार संघातील उमेदवार आहेत. ते आधीही भाजपचे मंत्री राहिलेले आहेत. सुरेश खन्ना शाहजहांपुर येथून आठव्यांदा  जिंकले आहेत. कॅबिनेट मंत्रीपदाची त्यांनी आज शपथ घेतली.

बहुजन समाजवादी पार्टी सोडून भाजपमध्ये दाखल झालेले कुशीनगर मधील पंडरौना येथील आमदार स्वामी प्रसाद मौर्य यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. कानुपुरच्या महाराजपुर मतदार संघातून सातव्यांदा जिंकलेले सतीश महाना यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. बरेलीचे आमदार राजेश अग्रवाल यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

यावेळी एकूण 44 मंत्री शपथ घेणार असून यामध्ये 22 कॅबिनेट मंत्री, 15 राज्य मंत्री आणि  9 स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

शपथग्रहण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित आहेत.

असे असेल योगी आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळ :

कॅबिनेट मंत्री

चेतन चौहान- कॅबिनेट मंत्री
लक्ष्मी नारायण चौधरी- कॅबिनेट मंत्री
श्रीकांत शर्मा- कॅबिनेट मंत्री
एसपी सिंह बघेल- कॅबिनेट मंत्री
राजेश अग्रवाल- कॅबिनेट मंत्री
धर्मपाल सिंह- कॅबिनेट मंत्री
सुरेश खन्ना- कॅबिनेट मंत्री
आशुतोष टंडन- कॅबिनेट मंत्री
ब्रजेश पाठक- कॅबिनेट मंत्री
रीता बहुगुणा जोशी- कॅबिनेट मंत्री
मुकुट बिहारी वर्मा- कॅबिनेट मंत्री
रमापति शास्त्री- कॅबिनेट मंत्री
सतीश महाना- कॅबिनेट मंत्री
सत्यदेव पचौरी- कॅबिनेट मंत्री
जयप्रकाश सिंह- कॅबिनेट मंत्री
स्वामी प्रसाद मौर्य- कॅबिनेट मंत्री
सूर्य प्रताप साही- कॅबिनेट मंत्री
दारा सिंह चौहान- कॅबिनेट मंत्री
राजेंद्र प्रताप सिंह (मोती सिंह)- कॅबिनेट मंत्री
सिद्धार्थ नाथ सिंह- कॅबिनेट मंत्री
नंदकुमार नंदी- कॅबिनेट मंत्री
ओमप्रकाश राजभर- कॅबिनेट मंत्री

राज्य मंत्री

गुलाबो देवी- राज्य मंत्री
लदेव ओलख- राज्य मंत्री
अतुल गर्ग- राज्य मंत्री
मोहसिन रज़ा- राज्य मंत्री
अर्चना पांडे- राज्य मंत्री
रणवेंद्र प्रताप सिंह (धुन्नी सिंह)- राज्य मंत्री
मन्नू कोरी- राज्य मंत्री
ज्ञानेन्द्र सिंह- राज्य मंत्री
जयप्रकाश निषाद- राज्य मंत्री
गिरिश यादव- राज्य मंत्री
संगीता बलवंत- राज्य मंत्री
नीलकंठ तिवारी- राज्य मंत्री
जयकुमार सिंह जैकी- राज्य मंत्री
सुरेश पासी- राज्य मंत्री
संदीप सिंह- राज्य मंत्री

राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)

भूपेंद्र सिंह चौधरी- राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
धर्म सिंह सैनी- राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
सुरेश राणा- राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
महेन्द्र सिंह- राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
स्वाति सिंह- राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
अनुपमा जायसवाल- राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
उपेंद्र तिवारी- राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
अनिल राजभर- राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)
स्वतंत्र देव सिंह- राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार)

LEAVE A REPLY

*