कपिल शर्मा अन् सुनील विमानातच भिडले..

Email This Post

ऑस्ट्रेलियाहून भारतात परतत असतांना विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवारचे विमानातच भांडण झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. नशेच्या भरात कपिलने सुनीलशी वाद घातल्याचे समोर आले आहे. भांडण बाचाबाचीतून हाणामारीत झाल्याने कपिलचे सहकारीदेखील कपिलवर कमालीचे नाराज आहेत.

सध्या कपिलला सिनेमाच्या अनेक ऑफर येत आहेत त्यामुळे तो आपल्या सहकाऱ्यांशी असा वागत असल्याचेही या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

या घटनेवेळी विमानातील इतर प्रवासीही घाबरले होते. त्यांनी इमर्जन्सी लॅण्डिंगचीही मागणी केली होती. मात्र यावेळी इतर सदस्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर कपिल शांत झाला. याप्रकरणी सुनिल ग्रोवरनं मौन बाळगले आहे. सुनिल ग्रोवर कपिलचा शो सोडण्याचा विचार करत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*