मनपातर्फे आज ‘खान्देश क्वीन’ स्पर्धा – अभिनेत्री अलका कुबल, उद्योजिका उज्वला हावरे यांची उपस्थिती

Email This Post

धुळे | प्रतिनिधी :  जागतीक महिला दिनानिमित्त धुळे महानगरपालिका व अन्यन्या ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देश क्वीन स्पर्धेचे आयोजन सुप्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल व प्रसिध्द उद्योजिका श्रीमती उज्वला हावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१८ मार्च २०१७ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदीर येथे महापौर सौ.कल्पना महाले व आयुक्त संगीता धायगुडे तसेच सौ.रेखा मुदंडा यांनी केलेले आहे.

खान्देश युवती व भगिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, सौंदर्य स्पर्धांची माहिती यासाठी स्पर्धेचे आयोजन धुळे महानगरपालिका व अन्यन्या ग्रुप यांच्यावतीने करण्यात आलेले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिध्द अभिनेत्री अलका कुबल व प्रसिध्द उद्योजिका उज्वला हावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा होणार आहे.

माजी आ.राजवर्धन कदमबांडे व सौ.मिनाक्षी कदमबांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार असून दिपप्रज्वलन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, महिला बालकल्याण सभापती सौ.इंदुबताई वाघ, उपमहापौर उमेर शव्वाल अन्सारी, स्थायी सभापती कैलास चौधरी, सभागृह नेता अरशद पठाण, विरोधी पक्षनेता गंगाधर माळी, उपसभापती महिला बालकल्याण सौ.चंद्रकला जाधव, शिक्षण मंडळ सभापती संदीप महाले, उपायुक्त रविंद्र जाधव, श्रीमती आशाताई छाजेड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेचे बाहेरील तज्ज्ञ परिक्षकांमार्फत परिक्षण करण्यात येणार असून विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशी रोख पारितोषिके अनुक्रमे रु.७०००, ५००० व ३००० तसेच स्मृतीचिन्हे देण्यात येणार आहेत. त्याव्यतिरिक्त बेस्ट स्माईल, बेस्ट हेअर व व्यक्तीमत्व यासाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.

या स्पर्धेच्या ४ पात्रता फेरी असून प्रत्येक फेरीत स्पर्धकांची निवड होत जाणार आहे. प्रेक्षकांनाही प्रश्‍नफेरीची बक्षिसे मिळणार आहेत. कार्यक्रमात सांस्कृतीक नृत्यप्रकार सादर होणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोरीयोग्राफर श्री.गळवे, स्पर्धाप्रमुख शितल शाह, श्रीमती सुषमा अग्रवाल परिश्रम घेत आहेत.

उपस्थितीचे आवाहन महापौर सौ.कल्पना महाले व आयुक्त संगीता धायगुडे तसेच अनन्या ग्रुपच्यावतीने सौ.रेखा मुदंडा यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

*