खेळाडूंनी सोशल मिडीयापासून दूर रहावे : महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू विजय चौधरी

Email This Post
जळगाव:  सोशल मिडीयामुळे एकाग्रता भंग होण्याचा धोका असल्यामुळे क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाज्या खेळाडूंनी सोशल मिडीयापासून दूर रहावे त्याच बरोबर प्रत्येक स्पर्धेच्यावेळी आपले गुरू, आई-वडील आणि सहकार्य करणाज्या मित्रांची आठवण ठेवल्यास कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू विजय चौधरी यांनी केले.
images
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जिमखाना डे  निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.पी.पी.माहुलीकर, प्र.कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी होते. मंचावर क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील उपस्थित होते. सन 2015-16 व 2016-17 या शौक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाज्या खेळाडूंचा गौरव यावेळी करण्यात आला.
विजय चौधरी म्हणाले की, आई-वडील हे आपल्या भल्यासाठी सांगत असतात त्यामुळे त्यांचे आपण ऐकायला हवे, त्यांना उलट उत्तर देवू नये, मेहनत आणि कष्टाशिवाय यश नाही. आज अनेक तरूण मित्र व्यासनाच्या आहारी जात आहेत त्यांना त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करा.
एखाद्या खेळातील अपयशामुळे मनाची स्थिती कमजोर होते आणि हा खेळाडू संपला असे अनेकजण म्हणू लागतात तेव्हा हतबल न होता त्या मनाच्या स्थितीला आपली ताकद बनवा आणि खेळा अशा वेळी कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. 2012 मध्ये माझ्याही पायाला दुखापत झाली तेव्हा विजय संपला असे अनेक जण म्हणत होते.
मात्र मी त्या मनाच्या कमजोर स्थितीला माझी ताकद बनविली आणि यश प्राप्त केले. आपला प्रवास सांगताना चौधरी म्हणाले की, घरात वडील आणि भाऊ पहिलवान होते. मला कुस्तीपेक्षा क्रिकेटची आवड होती मात्र वडीलांनी कुस्तीसाठी मार्गदर्शन केले. दहावी पासून कुस्ती खेळू लागलो.
सकाळी कॉलेज दुपारी कुस्तीचा सराव, शेतीची कामे असे करून कुस्ती शिकलो. कुस्तीच्या पुढील मार्गदर्शनासाठी पुण्याला गेलो परंतू तेथे सुरवातिला प्रवेश मिळाला नाही. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून खेळताना कोल्हापूर येथे कुस्तीत ब्रांझ पदक मिळाले. पुन्हा पुण्याला गेलो कुस्तीसाठी प्रवेश घेतला परंतू खर्च अफाट होता. हळूहळू वेगवेळ्या ठिकाणी कुस्त्या खेळून पौसा मिळू लागला त्यातून खुराक्याचा खर्च भागू लागला.
सुरवातीला पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी केली परंतू कुस्ती हेच आपले क्षेत्र असल्याचे समजल्यामुळे कुस्तीकडेच लक्ष केंद्रीत केले. मातीत खेळूनही तीन वेळा महाराष्ट्र केसरी होता येते हे मी दाखवून दिले असेही त्यांनी यावेळी सांगितले. विद्याथ्र्यांना त्यांनी यावेळी कुस्तीचा सराव आणि आहार याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
   अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील म्हणाले की, अभ्यासासोबतच आयुष्यात खेळालाही महत्व असायला हवे. खेळामुळे सांघिक , खिलाडू, नेतृत्व वृत्ती वाढीला लागते. आत्मविश्वास, एकाग्रता, सहनशिलता या गोष्टींचा विकास होतो असे सांगून नव्या शौक्षणिक वर्षात जिल्हावार क्रीडा महोत्सव घेणार असल्याचे जाहीर केले. प्र.कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी दुर्दम्य इच्छा शक्तीच्या बळावर यश कसे प्राप्त करता येते हे विजय चौधरी यांनी दाखवून दिले असून त्यांचा आदर्श खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी  केले. सहायक क्रीडा संचालक आर.ए.पाटील यांनी आभार मानले.
  यावेळी सन 2015-16 चा उमविचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळाचा विद्यार्थी अरविंद जावळे याला गौरविण्यात आले. जौन उद्योग समुहाने विद्यापीठाला दिलेल्या देणगीच्या व्याजातून खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे सुवर्णपदक जावळे यास देण्यात आले. त्याने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत उमविला सुवर्णपदक प्राप्त करून दिले होते. सन 2016-17 चा उत्कृष्ट खेळाडू म्हणून धनाजी नाना महाविद्यालयाचा खेळाडू उमेश कोळी यास गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे सन 2015-16 मध्ये आंतरमहाविद्यालयीन, आंतरविभागीय, आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच विविध स्पर्धा आयोजन व उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रथम दहा महाविद्यालयांना सन्मानित करण्यात आले.
प्रथम क्रमांक – नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव ,
व्दितीय क्रमांक – एस.एस.व्ही.पी.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय,धुळे
तृतीय क्रमांक – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर,
चौथा क्रमांक – एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपुर,
पाचवा क्रमांक – पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक संस्थेचे महाविद्यालय, शहादा,
सहावा क्रमांक – एम.डी.पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे,
सातवा क्रमांक – बी.पी.कला, वाणिज्य व    विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव,
आठवा क्रमांक – सौ.र.ना.देशमुख महाविद्यालय, भडगाव,
नववा क्रमांक – श्रमसाधना संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी
तसेच महिला महाविद्यालयांमधुन प्रथम क्रमांक जळगांव येथील डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय यांनी पटकाविला.  जळगांव, एंरडोल, धुळे व नंदुरबार अशा चार विभागांमधून  जळगांव विभागाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
सन 2016-17 मध्ये  उत्कृष्ट कामगिरी करणारे प्रथम दहा महाविद्यालये पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक – एस.एस.व्ही.पी.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय,धुळे ,
व्दितीय क्रमांक – नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालय, चाळीसगाव
 तृतीय क्रमांक – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर,
चौथा क्रमांक- उत्तमराव पाटील महाविद्यालय, दहिवेल,
पाचवा क्रमांक – पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक संस्थेचे महाविद्यालय, शहादा,
सहावा क्रमांक – श्रमसाधना संस्थेचे अभियांत्रिकी  महाविद्यालय, बांभोरी,
सातवा क्रमांक – सौ.र.ना.देशमुख महाविद्यालय, भडगाव,
आठवा क्रमांक- एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपुर,
नववा क्रमांक –  एम.डी.पालेशा वाणिज्य  महाविद्यालय, धुळे,
उत्तेजनार्थ – एकलव्य शरीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव तसेच महिला महाविद्यालयांमधुन प्रथम क्रमांक – डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय यांनी पटकाविला.
उत्कृष्ट विभागात जळगांव विभागाने प्रथम क्रमांक प्राप्त केला.

LEAVE A REPLY

*