दोंडाईचा न.पा.तर्फे मोफत सीईटी मार्गदर्शन – सुविधा देणारी महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका

Email This Post

दोंडाईचा |  प्रतिनिधी :  दोंडाईचा वरवाडे नगरपालिकेतर्फे १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एम.एच.टी / सीईटीचे मोफत क्लासेस सुविधा उपलब्ध करून देणार असून अश्याप्रकारची सुविधा देणारी दोंडाईचा ही महाराष्ट्रातील पहीलीच नगरपालिका असावी.

दोंडाईचा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांच्या संकल्पनेतुन दोंडाईचा नगरपालिकेमार्फत प्रथमच नावीन्यपूर्ण असा उपक्रम राबविला जात आहे.

नगरपालिकेच्या महीला बालकल्याण समिती व अचिवर्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परिक्षेचे मोफत आयोजन करण्यात आले असून हे क्लास दि. २३ मार्च पासून दोंडाईचा येथे सुरू होणार  आहेत.

विद्यार्थ्यांसाठी अशी सुविधा देणारी दोंडाईचा ही महाराष्ट्रातील पहिलीच नगरपालिका असावी. क्लासेस साठी बाहेर गावी न जावू शकणार्‍या सामान्य घरातील विध्यार्थ्यांना या क्लासेस चा फायदा होणार आहे. अश्या क्लासेस साठी मोठ्या प्रमाणावर फी आकारली जाते.

परंतु नगरपालिकेच्या या उपक्रमामुळे आता  आर्थिक ताण कमी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या मोफत क्लासेसला प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांनी अचिव्हर्स क्लासेसला संपर्क साधावा तसेच या क्लासेससाठी दोंडाईचा शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थांना लाभ घेता येणार आहे. त्यासाठी २१ मार्च पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

या मोफत क्लासेस चा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, पाणीपुरवठा सभापती रणवीरसिंग देशमुख, बांधकाम सभापती संजय मराठे, महीला बालकल्याण सभापती आफरीन बागवान, आरोग्य सभापती वैशाली महाजन, शिक्षण सभापती प्रियांका ठाकूर, मुख्याधिकारी रोहीदास वारुडे व अचिव्हर्स क्लासेसचे संचालक जितेंद्र गिरासे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*