हस्ती बँकेला रोटरी क्लबचा पुरस्कार

Email This Post

दोंडाईचा | प्रतिनिधी :  नोटबंदीनंतर बँकांमध्ये नोटा बदली करण्यासाठी तसेच खात्यात पैसे भरण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती.या काळात दि हस्ती को-ऑप. बँकेने मात्र ग्राहकांना सकाळी १०.३० वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अखंडित सेवा दिली. ग्राहकांना दिलेल्या उत्तम सेवेबद्दल रोटरी क्लब ऑफ दोंडाईचातर्फे हस्ती बँकेचा सन्मान करण्यात आला.

दि.९ नोव्हेंबरपासून ५०० व एक हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही बँकांबाहेर सकाळी सात वाजेपासूनच ग्राहकांच्या रांगा लागत होत्या.

यासर्व धावपळीत राज्यात ग्राहकांना तत्पर व कोणत्याही व्यत्ययाविना सेवा उपलब्ध करुन दिली. बँकेच्या जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तसेच पुणे येथील शाखेतील कर्मचारी ग्राहकांना विनम्रपणे सेवा देत, पुरेशी माहिती नसलेल्या ग्राहकांना मार्गदर्शन देखील करीत होते.

यामुळे हस्ती बँकेच्या सर्व शाखांमद्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती. ग्राहकांना गर्दीतही वेळेवर व विनम्रपणे सेवा देत हस्ती बँकेने ग्राहक सेवेचे वचन निभावले होते. या कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ दोंडाईचाचे अध्यक्ष डॉ.चेतन बच्छाव, रोटरी प्रतिनिधी डॉ.सुभाष फुलंब्रीकर, डॉ.दिलीप पाटील, डॉ.हेमंत नागरे, श्रीकांत इंदाणी, राकेश जैस्वाल, डॉ.ओमप्रकाश अगविाल, अंकुश अग्रवाल, आर्किटेक्ट हिमांशू शाह यांच्यातर्फे हा सन्मान दि.१० मार्च रोजी प्रदान करण्यात आला.

बँकेतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, जनरल मॅनेजर माधव बोधवाणी, असि.जनरल मॅनेजर अनिल मराठे यांनी हा सन्मान स्वीकारला.

LEAVE A REPLY

*