शिरपूर मर्चंट बँक अध्यक्षपदी प्रसन्न जैन उपाध्यक्षपदी काशिनाथ माळी यांची निवड

Email This Post

शिरपूर | प्रतिनिधी :  शिरपूर मर्चंट स्बँकेच्या अध्यक्षपदी प्रसन्न जयराज जैन यांची सलग दुसर्‍यांदा व उपाध्यक्ष पदावर काशिनाथ सोमा माळी यांची माजी शिक्षणमंत्री आ. अमरिशभाई पटेल व प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड झाली आहे.

शिरपूर मर्चंट बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी सहाय्यक निबंधक मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. नवनिर्वाचित संचालकांमधून सत्ताधारी गटातर्फे चेअरमन पदासाठी प्रसन्न जयराज जैन व व्हाईस चेअरमन पदासाठी काशिनाथ सोमा माळी यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आले.

यावेळी सत्ताधारी गटाचे प्रसन्न जयराज जैन, काशिनाथ सोमा महाजन, राजेंद्र शिवप्रसाद पंडीत, नवनित गिरधारीलाल राखेचा, साहेबराव भिका महाजन, रामचंद्र उखा ठाकरे, विनोद शांतीलाल चावडा, मनोज ओमप्रकाश अग्रवाल, मुकेश ताराचंद अग्रवाल, सौ.पूनम राजेश भंडारी हे सर्व १० संचालक, बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तर विरोधी गटातर्फे तुषार विश्वासराव रंधे, किरण यशवंत दलाल, केवलसिंग बाबुराव राजपूत, महेश जयराम लोहार, सौ. स्मिता वनितलाल कोठारी हे सर्व पाचही संचालक अनुपस्थित होते.

निर्धारित वेळेत बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रसन्न जयराज जैन व उपाध्यक्षपदासाठी काशिनाथ सोमा माळी यांचेच अर्ज  दाखल झाल्याने सहाय्यक निबंधक मनोज चौधरी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा  सत्कार करण्यात येऊन मिरवणूक काढण्यात आली.

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रसन्न जयराज जैन यांनी पाच वर्षे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळून यशस्वीपणे बँक चालविली होती. तसेच त्यांच्यासोबत उपाध्यक्ष उत्तमराव माळी यांनी चांगले काम केले होते.

सुरुवातीस जनकव्हीला, येथे आ. अमरिशभाई पटेल व व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली  सत्ताधारी गटाच्या नवनिर्वाचित १० संचालकांची बैठक घेण्यात येवून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी नावे जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्यांचेच अर्ज अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

*