चिनावल येथे दंगल, १५ जण जखमी

Email This Post

चिनावल,ता.रावेर | वार्ताहर : चिनावल येथे आज दि. २८ रोजी मंगळवारच्या आठवडे बाजारात हिंदू महिलेचा भाजीपाला फेकुन देत तिला मारहाण केल्याच्या कारणावरून दुपारी ३ वाजेच्या सुमारास तुफान हाणामारी झाली. यात दगडफेक करीत एका गटाकडील शेकडोच्या वर जमावाने हिंदूवंस्त्यांवर हल्ले चढवल्याने मेन बाजार गल्लील अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे.

दरम्यान १५ ते २० जणांवर दगडफेक करीत गल्लीत तलवारी पारजत बंदुकीतून गोळीही झाडत दहशत निर्माण केल्याने गावकर्‍यांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. सुमारे एक तास हा दंगा सुरू होता.

पोलिसांना हि माहिती मिळून ते घटनास्थळी दाखल होई पर्यंत बराच उशीर झाला होता. दगडफेकीमुळे अनेक गावकरी जखमी झाले आहेत. तर महिलांना घरात घुसून मारहाण करण्यासह विनयंभंगही करण्यात आला आहे. तर लहाणन मुलांचे दंगेखोरांनी लचके तोडले.

पोलिस येत असल्याचे पाहत दंगेखोरांनी मुख्य गल्ली सोडून इतर वस्त्यंावर हल्ले चढवले. यामुळे सर्व गावकरी भयभित होत ग्रामपंचायतीजवळ जमा होत दंगेखोरांना अटक करण्याची मागणी साठी ठिय्या आंदोलन सुरू केले.
गावात अजुनही तणावग्रस्त स्थिती आहे.

LEAVE A REPLY

*