धुगधुगी…!

Email This Post

उद्या मतमोजणी… गुरुवार दुपारपर्यंत सारे चित्र स्पष्ट होणार, महापालिका अणि जि. प. निवडणुकांचा सिनेमा जरी उद्या रिलीज होणार असला तरी, राज्याच्या राजकारणाचे चित्र स्थिर असेल की अस्थिर…? याबाबत  उत्सुकता शिगेला आहे, कारण यावेळी प्रथमच स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर राज्य स्थिरतेच्या चर्चा सैराट झाल्या आहेत. याशिवाय आजची रात्र उमेदवारांसाठीही ‘कत्ल की रात’ असल्याने, त्यांच्या उरातील धडधड उद्या गालावर लाली आणते की उदासी….? याच ‘धुगधुगी‘वर आजची चावडी!

गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीच्या धामधुमीत आंबलेल्या गुंड्याभाऊंनी श्रमपरिहाराचे औचित्य साधून दोन पेग रिचविले….विरोधकांशी छुपे आणि खुले दोन हात करुन शरीरासह मनाला आलेली अवकळट दूर घालविण्यासाठी त्यांना मदिरा जवळची वाटली असावी, खरं तर आमलेले शरीर आणि मन केवळ निमित्त होत, कारण गेल्या महिन्याभरापासून तर त्यांच्या डोळ्यावरील पापण्यांची निवांत अशी भेट घडलीच नव्हती…. आणि परवा-परवा मतदान झाल्यापासून तर जीवाची घालमेल कैक पटीनं वाढली होती..

. सारं काही ऑलवेल वाटत असतांना शे-पाचशे मतांनी सीट गेल्याचे भ्रम त्यांना अर्धवट झोपेत डंख मारीत होते. अखेर, आलो…. पडलो…च्या धुगधुगीत त्यांच्या डोळ्यांवरील पापण्यांची घट्ट भेट झाली, अन गुंड्याभाऊ पार घोरायला लागले….!

ईलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशिन आल्यापासून एक बरं झालं, उमेदवारांची घालमेल जरा लवकर संपायला लागलीय, आताही सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला आणि गुंड्याभाऊ उगाचच कधी हात चोळीत, तर कधी बोट मोडीत काऊंटींग टेबलभोवती ङ्गिरत होते.

purushtom guddam logo cahvdi

शेवटची ङ्गेरी सुरु झाली. विरोधकात आणि त्यांच्यात केवळ ४२० मतांचे अंतर होते. अखेरच्या ङ्गेरीत लीड घेतला नाही, तर काही खरे नाही, अशी सगळी अटीतटीची लढाई असतांनाच शेवटची ङ्गेरी संपली आणि गुंड्याभाऊ ३७९ मतांनी विजयी झाले. विजयाची दोन बोटे दाखवित आणि संभाव्य हर्षवायूचा झटका सांभाळीत, गुंड्याभाऊ मतमोजणी केंद्रबाहेर आले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

दोघांनी तर त्यांना डोक्यावर उचलून धरले, काहींनी सुगंधी ङ्गुलांच्या माळा ओवाळून टाकल्या.. ढोल ताशांचा खणखणाट गुंड्याभाऊंना ‘सजा’ झाल्याची ‘ङ्गिलींग’ देत होता… गुलाली उधळण थांबायच नाव घेत नव्हती… अणि तितक्यात एका उत्साही कार्यकर्त्याने गुलालची ङ्गक्की दोन्ही हातात भरली आणि थेट गुंड्याभाऊंच्या राकट चेहर्‍यावर भिरकावली… सारी गुलाबी भुकटी नाका-तोंडासह-डोळ्यात शिरताच गुंड्याभाऊ ताडकन भानावर आले.. आणि बघतो तर काय? गाढ झोपेतून उठून गुंड्याभाऊ बिछान्यावर हबकून बसले होते…

आज सकाळी सकाळीच बायकोने भिंतीवरची जळमट काढण्यासाठी लांब झाडू हातात घेतला होता, भिंतीवरची झाडू लगावल्यावर जळमटातील माती गुंड्याभाऊंच्या चेहर्‍यावर पडली होती, आणि झोपेतील स्वप्नात मात्र भिंतीवरील माती त्यांना गुलालाची अनुभूती देऊन गेली….! निवडणुकीच्या काळात हे अस अनेकदा होऊन गेलं होत… जरा कुठे डुलकी लागली की कधी निवडून आल्याचे तर कधी पडल्याचे स्वप्न गुंड्याभाऊंना नित्याचेच होऊन बसले होते.

….मित्रोंऽऽऽ गुंड्याभाऊंच्या स्वप्नांची आणि धकूड-पकूड केवळ प्रातिनिधीक स्वरुपाची आहे, महापालिका आणि जि. प. व पं. स. निवडणुकीत नशिब अजमावणार्‍या उमेदवारांना गुंड्याभाऊ सारखीच ‘ङ्गिलींग’ मिळत असणार, यात शंका नाही…. पण आज गुरुवार (दि. २२)ची रात्र पुन्हा एकदा आयुष्यातील ‘कत्ल की रात’ वाटल्याशिवाय राहणार नाही.

पण उमेदवारांना एक सांगण राहील, ‘जित गये तो जीत की खुशी मे… और हार गये तो गम की रुसवाई मे….!’ अस म्हणून टेक इट इझी’ घ्यावे. राजकारणाची गादी सगळ्याच उमेदवारांच्या नशिबात येणे तरी शक्य नाही… निवडणुकीनंतर हार-जीतचे कवित्व संपल्यावर आपापल्या उद्योग-धंद्याकडे उमेदवार पुन्हा नव्या जोमाने लागतील यात शंका नाही, कारण….
ये थी कुछ कम नाही
तेरा दर छुटने के बाद |
हम अहपने पास लौट आए
दिल टूटने के बाद |

…अस म्हणत नव्या उमेदीने अर्थार्जन करण्यात आमचे उमेदवार बांधव गुंंतून जाणार आहेच. कारण निवडणुकीतील खर्चाचा बॅकलॉग भरुन काढण्याचे मोठे बळ त्यांच्या भुजांमध्ये त्यांना आणावे लागणार आहे.

यावेळी बेटींगवर मंदी?

नोटबंदीचा ङ्गटका बसा विधायक क्षेत्रांना बसला तसा तो विघातक प्रवृत्तींनाही बसला. प्रत्येक निवडणुकांमध्ये शर्यत (बेटींग) लावणे, आपल्याकडे नेहमीचेच झाले होते. मात्र यावेळी बेटींगचे प्रस्थ ङ्गारसे लाणवतांना दिसत नाही. यावेळीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये याबाबतची ङ्गारसी उत्सुकता नाहीच, पण बेटींग पूर्णपणे बंद आहे, असेही नाही.

मात्र जिथे लाखो-करोडोंच्या शर्यती लागत होत्या, तिथे आता गंमत ५०० ते पन्नास हजाराच्या आसपास येऊन ठेपली आहे. याला कारण केवळ नोटबंदीच नाही, तर प्रत्येक उमेदवाराला किंंवा त्यांच्या समर्थकांना वाटत असलेली  धुगधुगीसुध्दा आहे. शंभर टक्के विजयाची खात्री अगदी कुणालाही देता येत नसल्यानेही बेटींगची हवा यावेळी गुलं झाली आहे आणि बेटींगवर मंदी आली ते बरेच नाही का….?

महाराष्ट्र तख्ताचे काय!

राज्यात भाजपा सरकार आहे, मात्र ङ्गडणवीसांच्या सिंहासनाला शिवसेनेचच्या धनुष्यबाणाचा टेकू आहे. आतापर्यंत बर्‍यापैकी मस्त चालल.. पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काडीमोड झाला आणि निवडणुकीत दोघांनी एकमेकांवर विखारी टीका केली. अत्यंत शिवराळ भाषेत एकमेकांची लक्तरे प्रचारात काढूनही सत्तेमधील दोघांची भागीदारी कशी? हा प्रश्‍न विरोधकांसह सामान्यांच्याही मेंदूला झिंझिण्या आणणारा ठरला. दरम्यानच्या काळात ‘ङ्गडणवीस औट घटकेचे मुख्यमंत्री’ असे म्हणूनही उध्दव ठाकरेंनी प्रचार रणधुमाळीत मनोरंजन केले.

मात्र स्थानिक स्वराज्य निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे तख्त स्थिर असेल की अस्थिर हा प्रश्‍न ऐरणीवर येणार असल्याचे चित्र आहेच. खरं म्हणजे याबाबत सरकारला नोटीस पिरेडवर ठेवण्याची सेनेला का गरज पडली? या प्रश्‍नाचे उत्तर सर्वसामान्य चौकस नागरिकालाही सहज उमगण्यासारखे आहे. सेनेला महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळालेच तर कदाचित टेकू काढण्यच्या हालचालींना वेग येऊ शकतो, त्यातच राजकीय होण्यमानकार तथा राष्ट्रवादीचे उध्वर्यू पवार साहेबारंनीही ‘लिहून देतो… आता पाठिंबा नाही!’ असे निक्षून सांगितल्याने सेनेला भाजपाचा छोबीपछाड करण्याची ईच्छा तीव्रतेने होऊ शकते.

मात्र जर का उद्या मुंबई महापालिका हातातून निसटली तर, ‘तेल ही गेले आणि तूप ही गेले… हाती उरले… धुपाटणे!’ अशी अवस्था व्हायची. असे कदाचित शिवसेनेला वाटत असल्याने टेकू काढण्याचा मुहूर्त २३ ङ्गेब्रुवारीनंतर शोधण्याची हुशारी अधिक आहे. सत्तेचे दोघांपैकी एक केंद्र तरी तूर्तास आपल्या हाती असावे, ही राजकीय हुशारी शिवसेनेने ठेवली असल्यास हरकत तरी का?

मात्र मुंबई महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी उद्या भाजपाची मदत घेण्याची स्थिती निर्माण झाली तरी अंधारदालनात तडजोड केली जाईल आणि मुंबई सोन्याची कोंबडी पुन्हा एकदा शिेवसेनेच्या डाल्याखाली झाकली जाईल आणि त्याबदल्यात महाराष्ट्र तख्ताची पाच वर्षे स्थिरतेची हमी पुढ्यात घातली जाईल! सांगायच म्हणजे या निवडणुकीचा थेट संबंध राज्याच्या अस्थिरतेशी असल्यामुळे सामान्य राजकीय कार्यकर्त्यांसह पहिल्या ङ्गळीतील नेत्यांपर्यंत ही निवडणूक औत्सुक्याची ठरली आहे.

उद्याच्या निकालाआधीची ‘धुगधुगी’ केवळ उमेदवारांच्या मनातच नव्हे तर भाजपा, शिवसेनासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्याही मनात ठाण मांडून आहे!

मो. ९५४५४६५४५५

LEAVE A REPLY

*