‘या’ कारणांमुळे होऊ शकते मूत्रपिंड निकामी

Email This Post

लंडन | वृत्तसंस्था : शरीर हे वेगवेगळ्या अवयवांची एक उत्कृष्ट अशी सहकारी यंत्रणा आहे. यामधील एका अवयवाचे काम बिघडले तरी सर्व यंत्रणेवर परिणाम होतो. यापैकी महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी, अर्थात मूत्रपिंड. हे शरीराची स्वच्छता करणारे महत्त्वाचे अंग आहे आणि ही योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीर आजारांचे घर बनते.

मूत्रपिंड हे शरीरातील विजातीय पदार्थ बाहेर काढून रक्त स्वच्छ करते आणि शरीरात खनिजे आणि आवश्यक घटक यांचे संतुलन ठेवते. मूत्रपिंड खराब होण्यामागे अनेक कारणे असतात. त्यापैकी ही काही कारणे..

जर तुम्ही जास्त प्रमाणात लघवी रोखून धरत असाल तर ही सवय तुमच्या किडनीसाठी खूप धोकादायक आहे. यामुळे मुतखडा होण्याची शक्यता वाढते आणि मूत्रपिंड खराब होते. जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पित असाल तर मूत्रपिंडाला रक्त शुद्ध करण्यासाठी जितके पाणी लागते ते पर्याप्त प्रमाणात मिळणार नाही आणि तुमच्या रक्तामध्ये जमा झालेली घाण तुमच्या शरीरातच राहील.जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढेल आणि मूत्रपिंडावर अतिरिक्त दबाव टाकेल.

जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स घेतल्यास तुमच्या शरीरातील प्रोटिन लघवीद्वारे बाहेर पडते. त्याचा मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो. अपुर्‍या झोपेचा मूत्रपिंडावर याचा वाईट प्रभाव पडतो. मांसाहार, सिगारेट, दारूचे सेवन करणे मूत्रपिंडावर वाईट प्रभाव टाकतात.

LEAVE A REPLY

*