जळगावात गुडघ्यावरील संगणकीय नॅव्हीगेशन शस्त्रक्रिया

Email This Post

पंकज पाटील| जळगाव : भारतातील दहावी व उत्तर महाराष्ट्रातील  पहीली नॅव्हीगेशन यंत्राच्या मदतीने संगणकाव्दारे  गुडघ्यावरील शस्त्रक्रिया येथील नॉर्दन जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरमध्ये करण्यात आली  असल्याची माहिती डॉ. मनिष चौधरी यांनी देशदूतशी बोलतांना दिली.

अपघात व वाढत्या वयामुळे गुडघे जोडणार्‍या सांध्यांची झिज होत असते. यामुळे चालतांना, मांडी घालतांना, उठून उभे राहत असतांना गुढघयांना वजन पेलवत नाहीत. अशा विकारावर गुडघे बदल शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य ठरते. त्यातही गुडघा बदल शस्त्रक्रिया करतांना ती अचुक होणे गरजेचे असते.

यासाठी जळगावात प्रथमच नॅव्हीगेशन नावाचे यंत्र नॉर्दन  नॉर्दन जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हे यंत्र ज़्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावयाची आहे त्यावर लावले जाते. त्यामुळे गुडघ्यावरील शस्त्रक्रिया अचुक करणे शक्य होते.

नॅव्हीगेशन यंत्राचा एकदाच वापर

गुडघा बदल शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या  नॅव्हीगेशन या यंत्राचा केवळ एकदाच वापर करता येतो. त्यानंतर हे यंत्र निकामी होत असते.

एक्स्लुझीव्ह जॉईंन्ट रिप्लेसंमेंट सर्जरी

याबात अधिक माहिती देतांना डॉ. मनिष जैन म्हणाले की, यात गुडघ्यातील दोन्ही वाट्या शस्त्रक्रियेव्दारे काढून तेथे नव्या वाट्या टाकल्या जातात. त्यात गुडघ्यामधील गादी, दोरीही व्यवस्थीत जोडली जाते. त्यामुळे गुडघ्याचे आयुष्य दहा वर्षांनी वाढते.

पाच दिवस दवाखान्यात पंधराच्या दिवशी कामावर

ही शस्त्रक्रिया केल्यानंतर साधारणपणे पाच दिवस रूग्णालयात रहावे लागते. त्यानंतर दहा दिवस घरी आराम करावा लागतो. टाके काढल्यानंतर रूग्ण पंधराव्या दिवसापासून पुर्ववत नव्या जोमाने काम करू शकतो. त्याच वेगाने चालणे, धावणे, मांडी घालून बसणे, उठणे यासारख्या क्रिया तो करू शकतो.

देशातील दहावी व  उत्तर महाराष्ट्रातील पहिली

भारतातील दहावी व उत्तर महाराष्ट्रातील  पहीली नॅव्हीगेशन यंत्राच्या मदतीने संगणकाव्दारे  गुडघ्यावरील शस्त्रक्रिया  जळगावच्या शाहू नगरातील  अभिनव विद्यालयासमोर असलेल्या पिआ आर्केडमध्ये नॉर्दन जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरमध्ये करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर गुडघे दुखत नाहीत. त्यामुळे यास घाबरण्याचे कारण नसल्याचेही ते सांगतात.

LEAVE A REPLY

*