मिनि मंत्रालयाची दंगल… रईस उमेदवार… अन काबिल कार्यकर्ते….!

Email This Post

प्रसंग पहिला – जेमतेम शहरवजा खेडेगाव… हाऊसिंग लोनच्या कृपेने चार खोल्यातील हक्काच्या घरात गुरुजी चिंतातूर बसलेले, रिटायमेंटची अवधी अवघी तीन वर्षे उरलेली, घुसर चष्म्यातून गुरुजी झेड.पी. अन पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी ऊरात साठविण्याचा प्रयत्न करीत होते.

तेवढ्यात लाडाकौतुकाने वाढविलेला ‘घरका चिराग’ पांढरेशुभ्र कडक इस्त्री केलेले कपडे परिधान करुन गुरुजींसमोर अवतरला, पप्पा… बाईकची चाबी द्या, महत्त्वाचे काम आहे अस म्हणून डोळ्याआड गेला!… हे रोजचच, नवीन नव्हत, मात्र आज पोरगं पांढरा कडक झब्बा घालून गेल कुठं? या प्रश्‍नाच्या उत्तराने गुरुजींची तंद्री भंगली. कारण बारावीचं वर्ष होत, परीक्षत्त अवघी महिनाभरावर पण कार्ट्याचं लक्षण ठिक नव्हत… पार दुपार टळून गेली तरी सोन्या जेवायला आला नाही म्हणून गुरुजींच्या सौभाग्यवतींनी चिंता व्यक्त केली.

चारदा मोबाईल लाऊनही कार्ट  ङ्गोन उचलत नव्हतं, माय बापाच काळीज त्याला कळत नव्हत. अखेर पाचव्या रिंगला पोरानं ङ्गोन रिसिव्ह केला. ‘मी रात्री उशीरा येईन, जेवायसाठी थांबू नको!’ असं सांगून आईचा  ङ्गोनही कट केला.
दोन मुलींची लग्न करुन उरलेला भविष्यकाळ पोराच्या उमेदीखाली जगावा, म्हणून वार्धक्याकडे झुकलेले नवरा-बायको एकमेकांच्या डोळ्यातील चिंता पाहून व्यथीत होते. पण इलेक्शनचा धुराळा उडाल्यापासून त्यांच्या चिंतेत भर पडू लागली होती… रात्री नऊ  वाजेदरम्यानही  ङ्गोन लावले.

पण चिराग ङ्गोन उचलायला तयार नाही. उगाच जगायसाठी दोन घास गिळावे, म्हणून दोघांनी हात धुतला, आणि सहजच टिव्हीवरील कलकल मिनमिनत्या डोळ्यांनी बघू लागले. रात्री साडेअकरा वाजले तरी चिराग घरी उजाळला नसल्याने मायबापाला घर खायाला उठलं होत, दोघांच्याही मनात एक चिंता व प्रश्‍न! पण कुणीच बोलत नव्हत. अखेर साडेबाराच्या सुमारास बाईकचा आवाज आला तसा दोघांचा जीव भांड्यात पडला.

बाईकवर चिरागसह तीन दोस्त झिंगलेल्या अवस्थेत काहीतरी बडबडत होते. गुरुजींनी थरथरत्या हातांनी गेट उघडल. पोरगं जवळपास पावली खेळतच बाईक लोटत आत शिरला. दारुचा भयंकर दर्पाने गुरुजींच्या माथ्यात चिंतेचा हत्ती चौखुर उधळला… काहीही ऐकण्याच्या स्थितीत नसलेल्या पोराला आधार देत, त्याला बिछान्यापर्यंत गुरुजींनीही भिंतीचा आधार घेतला. पोरगं क्षणात घोरायला लागलं आणि कुठल्या तरी राजकीय पक्षाचा दुपट्टा निजलेल्या पोराच्या गळ्यातून काढत तोच दुपट्टा तोंडावर दाबून गुरुजींनी मुकपणे हंबरडा ङ्गोडला…!

chavdi logo

प्रसंग दुसरा – वेळ रात्री साडेदहाची, शहराच्या चौङ्गुली पार करुन चार-पाच बाईक सुसाट वेगाने धुराळा उडवीत, शहराबाहेर निघाल्या, पाचपंचवीस पत्रे टाकून सजविलेल्या एका हॉटेलनुमा बार-ढाब्यावर कचाकचा बाईक थांबल्या, तरुण काबील कार्यकर्त्यांचा हा जथ्था मात्र हॉटेलमध्ये न शिरता बाहेरच थांबला.

तेवढ्यात अंड्याला आलेल्या कोंबडीगत उमेदवार असलेल्या रईस दादासाहेबांची चारचाकी गाडी हॉटेलसमोर करकली, अन गळ्यातील पक्षाचा दुपट्टा सांभाळत कार्यकर्त्यांच्या समोर दादासाहेब प्रकटले…. दिवसभर प्रचाराची धुळ दादासाहेबांच्या समेवत अंगावर घेऊनही कार्यकर्त्यांनी पटापट वाकून दादासाहेबांची पायधूळ आपापल्या मस्तकावर लावली…

ढाब्यावरच्या शेठजीला ठेवणीतला नमस्कार घालून दादासाहेबांची गाडी पुढे रवाना झाली. आणि कार्यकर्त्यांची चिअर्स म्हणत टेबलावर ग्लास आदळले!… ढाब्याचा शेठजीही मोठा रसिक, ‘हुई महंगी बडी शराब, थोडी-थोडी पिया करो…!’ ची गजल मंद आवाजावर ऐकवत, तो ऑर्डर पुरवित होता, तेवढ्यात पुन्हा चार-पाच बाईक ढाब्यासमोर धडाडल्या आणि बाजूच्या टेबल खुर्चीवर काबिल कार्यकर्त्यांचा दुसरा टोळका विराजमान झाला….

त्यांच्या शायरीसह पेग-पे-पेग चळवत दुसरा टेबलही गुलाबी झाला आणि झिंगाटलेल्या कार्यकर्त्यांचा आवाज वाढायला लागला… आमचाच पक्ष किती पवित्र, अन आमचाच किती काबिल… तुमचा पक्ष गद्दार… आम्ही तेवढे शिलेदार… अस तू तू – मै मै करित दोघ पार्ट्यांचा वाद विकोपाला गेला आणि ढाब्यासमोर रणकंदन माजले, खुर्च्यांची मोडतोड अन एकमेकांची डोकीङ्गोड झाल्यानंतर खाकी वर्दीची वरात दाखल व्हायच्या आत जखमी कार्यकर्ते लंगडत-पळत पसार झाले.

Untitled-2

… देशदूतच्या वाचकांनो ! वरील दोन्ही प्रसंग गावागावात शहराशहरात घडत आहेत. थोड्या ङ्गार  ङ्गरकाने असे किस्से आपण रोजच बघतोय! आता ग्रामीण भागात जि. प. आणि पं. स. या मिनिमंत्रालय समजल्या जाणार्‍या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वसामान्य छोट्या-अतिउत्साही कार्यकर्त्यांना विनंती आहे.

आपल्या थकलेल्या-पिचलेल्या मायबापांचे चेहरे डोळ्यासमोर ठेवा, आपल्या करिअरचे भविष्य ध्यानी घ्या, निवडणुकीच्या धामधुमीत तावातावात जास्त लोड देऊ नका, कारण काबिल कार्यकर्त्यांना तुमच्या या लोडची किंमत ङ्गक्त निवडणूक होईपर्यंतच राहणार आहे. शेवटी कुठल्याही राजकीय पक्षाला कार्यकर्ता हा त्या उमेदवारासाठी ङ्गोडणीतल्या कढीतील कढीपत्त्यासारखाच असतो.

प्रचाराच्या ङ्गोडणीतून तुमचा वापर संपला की, सत्तेच्या ताटात जेवताना सगळ्यात आधी तुम्हाला बाहेर  ङ्गेकले जाईल, याची जाण असू द्या. अहो, मतदान हा आपला अधिकार आहेच. मताधिकाराचा वापर करुन ज्याला मतदान करायचे त्याला करा. पण निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांसाठी एकमेकांच्या गच्च्या पकडून स्वतःची डोकी ङ्गोडून घेऊ नका. दोन-चार दिवस दादासाहेब धाब्यावर नेतीलही, पण पुन्हा घरची तांब्या-ताटली अन चटणी भाकरीच आपल्याला कामी येणार आहे.

हे विसरु नका. अहो, निष्ठा नावाचा रोग आता कायमचा परागंदा झाला आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, कोणतही नेता, कधीही, कोणत्याही पक्षा घुसू शकतो! आणि या आयाराम-गयारामच्या पक्षांतरानंतर ‘गोची’ होते,  ङ्गक्त तुमची… म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात मताधिकार प्रक्रियेत सामील व्हा, समक्ष सक्षम आणि स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार लक्षात घेऊन कोणत्याही पक्षाचा असला तरी हरकत नसावी… नव्या पिढीतील, नव्या दमाच्या तरुणांनी हे केलचं पाहिजे, नाही का?

जळगाव जिल्ह्यातील ६७ जिल्हा परिषद गट आणि १३४ पंचायत समिती गणामध्ये राजकीय धुमशान सुरु झाले आहे. जिल्ह्यातील मिनिमंत्रालयासाठी हे एकूण २०१ उमेदवार निवडून येणारच पण, पण या उमेदवारांच्या विजयासाठी आपली आन-बान-शान पणाला लावणार्‍या भाबड्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची गरज आहे.

यंदाचा प्रचार रणधुमाळीत अगदी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून रात्रीचा कैङ्ग ओसांडतो आहे. ज्याचे नुकतेच दुधाचे ओठ सुकलेत, ते दहावी आणि बारावीचे पोरंही या रणधुमाळीत ‘तळीरामी दीक्षा’ घेणार नाहीत ना…? याचीही काळजी घेणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. कारण निवडणूक झाल्यानंतर गण आणि गटात असं चित्र तरी बघायला मिळू नये…!
सर्व काही ठिक आहे…
सर्व काही छान आहे!
अन मिनि मंत्रालयाच्या दंगलीत
रईस उमेदवारांच्या हाती…
काबिल कार्यकर्त्यांची मान आहे!
भ्रमणध्वनी – ९५४५४६५४५५

LEAVE A REPLY

*