एलजीचा युएचडी टिव्ही

Email This Post

लजी कंपनीने नॅनो सेल्सनी युक्त असणारे फोर-के रेझोल्युशन्सच्या एलसीडी टिव्हींची नवीन मालिका बाजारात सुरु केली आहेत.
अल्ट्रा हाय डेफिनेशन (युएचडी) म्हणजेच फोर-के क्षमता असणारे टिव्ही आता लोकप्रिय होत आहेत. यामुळे बहुतांश कंपन्या या प्रकारातील टिव्ही ग्राहकांना सादर करत आहेत.

एलजी कंपनीनेही २०१७ साठी एसजे ८०००, एसजे८५०० आणि एसजे ९५०० हे तीन टिव्ही सादर केले आहेत. एलजीचे हे तिसर्‍या पिढीतील सुपर युएचडी या प्रकारातील टिव्ही आहेत. यात विशेषत म्हणजे यात नॅनो सेल वापरण्यात आले आहेत. याच्या मदतीने या टिव्हींमध्ये अतिशय उच्च दर्जाची चित्र दिसणार असल्याचे कंपनीने नमुद केले आहे.

एलजीचे हे तिन्ही टिव्ही वेबओएस या स्मार्ट टिव्ही प्रणालीवर चालणारे आहेत. यात एचडी रेकॉर्डरही असेल. तसेच याच्या रिमोटवर विशिष्ट मॅजिक बटन देण्यात आले आहे.

याच्या मदतीने कुणीही नेटफ्लिक्स अथवा अमेझॉन व्हिडीओसारख्या हव्या त्या सेवांचा तात्काळ ऍक्सेस मिळवू शकेल. यात संगणक अथवा स्मार्टफोनमधील आभासी सत्यता म्हणजेच व्हिआर या प्रकारातील व्हिडीओजदेखील या टिव्हींवर पाहू शकणार आहेत.

LEAVE A REPLY

*