नोकिया-६ स्मार्टफोन बाजारात दाखल

Email This Post

मोबाईल उत्पादनात अग्रेसर असणार्‍या नोकियाने पुन्हा या क्षेत्रात पुनरागमन केले असून नोकिया ६ हा अँड्रॉईड प्रणालीवर चालणारा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध झाला आहे.

दोन वर्षाच्या कालावधीनंतर नोकीयाने पुन्हा या क्षेत्रात पदार्पणाच्या हालचाली सुरु  केल्या आहे. एचएमडी ग्लोबल या कंपनीच्या माध्यमातून नोकिया ६ हा स्मार्टफोन नुकताच बाजारात उपलब्ध केला आहे.

नोकिया ६ या स्मार्टफोन असून हे मॉडेल पहिल्यांदा चीनमध्ये भारतीय चलनानुसार सुमारे १७ हजार रूपये किंमत निश्‍चित करण्यात आली आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले असून याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविणे शक्य आहे.

हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट या अद्ययावत प्रणालीवर चालणारे आहे. यातील कॅमेरे १६ आणि ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे असून बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*