रेझरचा तीन डिस्प्लेचा अनोखा लॅपटॉप

Email This Post

रेझर   या कंपनीने एक, दोन नव्हे तर चक्क तीन डिस्प्ले असलेला फोर-के रेझोल्युशनचा गेमिंग लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.

रेझर कंपनीने प्रोजेक्ट वलेरीच्या अंतर्गत हे गेमिंग लॅपटॉप विकसित केला आहे. यातील मुख्य स्क्रीनच्या मागे दोन डिस्प्ले स्वयंचलीत पध्दतीने दडलेले आहे. लॅपटॉप सुरू केल्यानंतर हे डिस्प्ले कार्यान्वित होतात. यामुळे कुणालाही एकच वेळेस तीन विविध कामे करता येणे शक्य होणार आहे.

विशेषत: गेमिंगमध्ये याच्या मदतीने अतिशय उत्तम पध्दतीने विविध गेम्सचा आनंद लुटता येतो. यात आठ जीबी व्हिडीओ रॅमसह एनव्हिडीयाचे जीफोर्स जीटीएक्स १०८० ग्राफीक कार्ड आहे. याची रॅम तब्बल ३२ जीबी इतकी आहे. याच्या जोडीला एनव्हिडीयाचीच साऊंड प्रणालीदेखील देण्यात आली आहे.

याच्या मदतीने विविध गेम्स यावर अगदी सहजपणे खेळणे शक्य आहे. रेझरने अद्याप फक्त या लॅपटॉपला प्रदर्शीत केले असल्यामुळे यातील सर्व फिचर्स व महत्वाचे आहे. विशेष म्हणजे रेझरने अद्याप याचे मूल्य जाहीर केलेले नाही.

LEAVE A REPLY

*