पर्यटन साक्षरता झाल्यास होईल आर्थिक विकास

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते तान एक्स्पोचे उदघाटन

Email This Post

नाशिक : महाराष्ट्राला 720 किमीचा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला असून केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेंतर्गत या समुद्र किनारयाचा विकास लवकरच केला जाणार आहे. पर्यटन क्षेत्रात विकास साधायचा असेल तर पर्यटन साक्षरता होणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले.

ट्ॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक यां संस्थेच्या वतीने जुना गंगापुर नाका परिसरातील टुरिझम एक्स्पो प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, भाजपाचे लक्षमण सावजी, तान संस्थेचे अधयक्ष दत्ता भालेराव, उपाधयक्ष राजेंद्र बकरे, प्रायोजक व चौधरी यात्रा कंपनीचे ब्रीजमोहन चौधरी, मनोज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

रावल पुढे म्हणाले की, अतिथी देवो भव ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली पाहिजे. आपल्याकडे येणारया पर्यटकांचे आदरतिथय करतांना रिक्षावाल्यांनाही योग्य सूचना त्यांच्यातही पर्यटन साक्षरता होणे आवशयक आहे. पर्यटनासाठी सकारात्मक काम करणयाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नाशिकमधये अशा प्रकारच्या टुरीझम एक्स्पो आयोजित होत असतांना धुळे, जळगाव, नंदुरबार याठिकाणीही अशाच प्रकारचा एक्स्पो आयोजित करणयात यावा जेणे करून तेथील नागरिकांनाही पर्यटन स्थळांची विविध सहलींची माहिती एका ठिकाणी, एका छताखाली मिळू शकेल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवशयक आहे. टुरीझम एक्स्पो या उपक्रमाचे त्यांनी मनापासून स्वागत केले.

प्रास्ताविकात दत्ता भालेराव यांनी सांगितले की, नाशिकमधील वाईन उदयोगाचा प्रशन प्रलंबित आहे. नाशिकमधये सर्वात जास्त धरणे, गड किल्ले असतांना पर्यटकांना येथे दोन दिवस निवांत राहता येईल अशी व्यवस्था शासनाने करावी. तसेच बोट क्लबचा प्रशनही मार्गी लावावा. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनी सहभागी सर्वच एजंट, आयोजकांचे कौतुक केले. कायक्रमाच्या सुरवातीला सर्वच मान्यवरांचे स्वागत करणयात आले. आमदार देवयानी फरांदे, तानचे पदाधिकारी दत्ता भालेराव यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार करणयात आला.

25 एजंटसचा सहभाग : या एक्स्पोमधये 25 एजंटचा सहभाग असून त्यात चौधरी यात्रा कंपनीसह सर्वांचाच समावेश आहे. स्थानिक पातळीपासून, जगभरातील सहली आयोजित करणारया एजंटसनी आपले स्टॉल्स सजविले आहेत. अजून दोन दिवस तरी हे प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले राहणार आहे. याठिकाणी विविध एजंटचे पदाधिकारी ग्राहकांना माहिती देणयासाठी सज्ज करणयात आले आहेत.

LEAVE A REPLY

*