बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला अजिंक्य चुंबळे फरार

Email This Post

इंदिरानगर (प्रतिनिधी):- नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या स्थायी समितीचे माजी सभापती, नगरसेवक शिवाजी चुंभळे यांच्या मुलावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने नवीन नाशिक सह महापालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संशयित चुंबळेला अटक करण्यासाठी पोलिस त्याच्या घरी पोहोचले असून तो फरार झाल्याचे समजते.

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास पीडित मुलीने संशयित आरोपी अजिंक्य शिवाजी चुंभळे (३०) रा.पांडुरंग निवास, लेखा नगर, नवीन नाशिक, याचे विरोधात लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणे,बळजबरीने गर्भपात करणे व धमक्या देणे या आरोपांवरून गुन्हा दाखल केला आहे. अजिंक्य चुंभळे याने लग्नाचे अमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याने आपल्याला दिवस राहिल्याचे व जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संशयित अजिंक्य चुंभळे यास अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतल नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
येत्या २५ तारखेस अजिंक्य चुंभळे याचा विवाह होणार असून या समारंभाची तयारीही पूर्ण झाल्याचे कळते, मात्र या प्रकरणाने विवाह सोहळ्या वर प्रश्न चिन्ह लागले असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरु आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नोंद क्र.३३६/१६ नुसार भा.द.वि.कलम ३७६(१), ३१३, ५०६ नुसार गुन्हा नोंदविला असून पोलीस निरीक्षक श्रीमती जाधव पुढील तपास करीत आहेत.

शिवाजी चुंभळे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.

LEAVE A REPLY

*