9 मद्य तस्करांच्या मुसक्या आवळल्या

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरावरील दारू बंद करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागात मद्याचा पुरावठा कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यापारी शहरातील काही दुकानांमधून मद्य विकत घेऊन जात आहेत. त्यामुळे या मद्य तस्करांच्या मुसक्या आवळ्यासाठी पोलिसांनी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. गेल्या दोन दिवसात शहरात 20 लाखापेक्षा जास्त दारु व 10 लाखांचा अन्य मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात नऊ जणांना आरोेपी करण्यात आले आहे.
संतोष सुधकर सरोदे (रा. बोल्हेगाव) जयदीप विभाकर काटे (रा. नालेगाव), चंदन बबन नालावडे (रा. नेवासा), संदीप वसंत बोरुडे (रा. नगर), भागवत गुलाबराव गडाख (रा. नेवासा), गोरक्ष दत्तात्रय जर्हाड, पोपट ममताजी पाचंगे (रा. भाळवणी), चुनिलाला तेलरेजा (रा. पाईपलाईन रोड), आनंद वनाजी लुहुंडे (रा. सिद्धार्थनगर) अशा नऊ जणांना आरोपी करण्यात आले आहे. तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शहरात विविध ठिकाणी पोलिसांनी सापळे रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील बहुतांश आरोपी हे ग्रामीण भागात दारुचा पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरातील ठरावीक दुकानदार मद्याचासाठा करून चढ्या भावात ती विकतात. हे विक्रेते ग्रामीण भागात ही दारु नेऊन त्याचे विभाजन करतात. त्यात बनावट मद्य मिश्रीत करुन पिण्यासाठी दिले जात असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यात पुन्हा पांगरमल घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाने या मद्य तस्करीवर अंकुश मिळविणे महत्वाची बाब ठरली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या मद्याचे नमुने घेतले जात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तापस पोलीस करीत आहेत.

 

लोकप्रतिनिधींचा वरदहस्त
शहरात अनेक ठिकाणी मद्या पकडल्याच्या घटना दाखल झाल्या आहेत. मात्र चितळेरोड, केडगाव, सावेडी अशा काही ठिकाणी पोलिसांनी दारुचा मुद्देमाल पकडला किंवा दुकानावर छापा टाकला की अशा वेळी पोलीस अधिकार्‍यांना एखाद्या लोकप्रतिनिधीचा फोन येतो. पोलिसांच्या तडजोडीतून हा माल सोडून दिला जातो. त्यामुळे दारुवर अंकुश ठेवत असताना अवैध धद्यावालांवर लोकप्रतिनिधींचा वरदरहस्त असल्याचे खाकीकडून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*