वाहन टोईंगद्वारे 78 लाखांचा दंड

0

नाशिक । दि.3 प्रतिनिधी
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच पार्किंगला वळण लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या टोईंगचा ठेका आज संपला.

दरम्यान गेल्या दीड वर्षात वाहन टोईंगद्वारे केलेल्या कारवाईत 58 हजार 521 जणांवर कारवाई करत 78 लाख 21 हजार रुपयांचा महसूल पोलीस प्रशासनाने मिळवला आहे.

अस्ताव्यस्त पाकिर्ंगमुळे शहरात मुख्य चौंकांमध्ये वाहतूककोंडी होत असल्याने 2015 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी वाहन टोइर्ंगला सुरुवात केली.

यासाठी याचे टेंडरिंग करून ठेका देण्यात आला होता. 2016 या वर्षात 40 हजार 648 मोटारसायकलींवर कारवाई करत 44 लाख 69 हजार 600 रुपयांचा महसूल जमा करण्यात आला होता.

तर 2211 चारचाकी वाहनांना टोईंग करत 2 लाख 24 हजाराचा महसूल गोळा करण्यात आला होता. परंतु चारचाकी वाहन उचलण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने हे टोईंग बंद करण्यात आले होते.

अखेरच्या काही दिवसांत ठेकेदारास आधुनिक टोईंग व्हॅनची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. काही व्हॅन आल्यानंतर पुन्हा सुरुवात करण्यात आली होती.

परंतु पुन्हा नुकसान झाल्याने 2017 मध्ये कार टोईंग बंद करण्यात आले होते. 2017 मध्ये अवघ्या 145 कारवर कारवाई करून 29 हजारांचा महसूल गोळा करण्यात आला होता. तर 2017 मध्ये जानेवारी ते आतापर्यंत 15 हजार 517 वाहनांवर कारवाई करत 30 लाख 88 हजार 500 रुपयांंचा महसूल जमा करण्यात आला आहे.

या वाहन टोईंगचा ठेका आज संपला असून पुन्हा नव्याने इ-टेंडरिंग करण्यात आले आहे. आता नव्या ठेकेदाराकडून टाईंगची कारवाई सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

*