70 आपसी आंतरजिल्हा बदलीधारकांची घरवापसी : शिक्षकांमध्ये आनंदोत्सव

0

उद्यापर्यंत कार्यमुक्त होणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून आंतरजिल्हा बदलीचा रखडलेला प्रश्‍न अखेर निकाली निघाल्याने तब्बल 70 शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने स्वत:च्या जिल्ह्यात सेवा करता येणार आहे.
आंतरजिल्हा बदलीसाठी संबंधित शिक्षकांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांना बरोबर घेऊन पाठपुरावा केला. वारंवार मंत्रालय व झेडपीवारी सुरुच ठेवली होती.दरवर्षी एप्रिल-मे मध्ये आपसी बदल्यांची प्रकरणे निकाली निघतात. यंदाच्या एप्रिल महिन्यातील शासननिर्णयामध्ये संबंधित बदल्यासंदर्भात उल्लेख नसल्याने आंतरजिल्हा बदलीधारकांमध्ये सभ्रमावस्था निर्माण झाली होती.
अखेर ग्रामविकास विभागाचे मंगळवार 16 मे चे पत्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राप्त झाले. त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची आपसी आंतरजिल्हा बदली करण्याबातची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशासकीय व रोस्टर अपूर्ण असणे अशा अनेक कारणांमुळे बदली प्रश्न अद्याप सुटत नव्हता .यासाठी अनेक प्रयत्न झालेे .पती-पत्नी एकत्रिकरण , एकतर्फी अशा कोणत्याच बदल्या होत नव्हत्या .राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनेक प्रयत्न झाले परंतु त्यास यश येत नव्हते .या बदल्या न झाल्याने जिल्ह्याचे अनेक सुपुत्र जिल्ह्याबाहेर होते .यात प्रामुख्याने महिलांचे प्रमाण जास्त होते.
पती एका जिल्ह्यात तर पत्नी दुसर्‍या जिल्ह्यात कार्यरत होते . त्यामुळे या बदल्या होणे अत्यंत गरजेचे होते .डिसेंबर 2016 मध्ये ग्रामविकास विभागाने नवीन आंतरजिल्हा बदली धोरण आणणार त्यामुळे सर्व आंतरजिल्हा बदल्या स्थगीत केल्या होत्या.तसेच दिनांक 14 मार्च 2017 च्या मुंबईच्या बैठकीत आपसी आंतर जिल्हा बदली सुद्धा नवीन शासननिर्णयात रद्द केल्या होत्या.
कोणत्याही अंतर जिल्हा बदल्या होत नसताना आपसी आंतर जिल्हा बदल्या होत होत्या.त्या बंद केल्याने राज्यातील जिल्हा परिषदेकडे सुमारे चार हजार आपसी आंतर जिल्हा बदलीचे प्रस्ताव प्रलंबित होते .त्यामुळे या शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता .
याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात ,शिक्षक संघाचे पदाधिकारी रावसाहेब रोहोकले ,आबासाहेब जगताप ,संजय फुंदे ,श्रीकृष्ण खेडकर व आंतर जिल्हाबदली कृतीसमितीचे नागेश लगड ,सचिन नाबगे ,किरण कोल्हे आदींनी गेल्या महिनाभरापासून ग्रामविकासमंत्री व ग्रामविकास विभाग यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला व या प्रयत्नास यश आले.या आपसी आंतर जिल्हा बदल्यांबाबत कार्यवाही करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने 16 मे रोजी तातडीने परिपत्रक काढून सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवले आहे.

त्या शिक्षकांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश
आपसी आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने दोन्ही जिल्हा परिषदांनी म्हणजेच कार्यरत असलेल्या व बदलीने जाण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे व सामावून घेण्याबाबतचे आदेश उद्या 18 मे पर्यंत काढावेत.तसेच संबंधित शिक्षकांनी कार्यमुक्त झाल्यावर बदलीने हजर होणार्‍या जिल्हा परिषदेस तात्काळ रुजू होणे अपेक्षित आहे. त्या ठिकाणी हजर झाल्यावर संबंधित शिक्षकांचे पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येणार आहेत.

त्या शिक्षकांना तात्काळ रुजू होण्याचे आदेश
आपसी आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने दोन्ही जिल्हा परिषदांनी म्हणजेच कार्यरत असलेल्या व बदलीने जाण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे व सामावून घेण्याबाबतचे आदेश उद्या 18 मे पर्यंत काढावेत.तसेच संबंधित शिक्षकांनी कार्यमुक्त झाल्यावर बदलीने हजर होणार्‍या जिल्हा परिषदेस तात्काळ रुजू होणे अपेक्षित आहे. त्या ठिकाणी हजर झाल्यावर संबंधित शिक्षकांचे पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येणार आहेत. 

LEAVE A REPLY

*