629 शाळा डेंजर झोनमध्ये

0

विद्युत तारा, डीपी, खांबामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका

 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद शाळेच्या आवारात 629 ठिकाणी महावितरण कंपनीने परवानगी न घेता उच्च दाब वीजवाहक तारा टाकल्या आहेत. तसेच खांब व वीज रोहित्र बसवलेले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. तातडीने या तारा, खांब आणि वीज रोहित्र हलवण्याची मागणी होत आहेत.

 
जिल्ह्यात आतापर्यंत विजेचा धक्का बसून जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. काही वर्षापूर्वी कोपरगाव तालुक्यात अशी घटना घडली होती. त्यात वीजेचा धक्का बसून एका विद्यार्थ्याला आपला प्राण गमवावा लागला होता. विशेष करून पावसाळ्यात वादळी वार्‍यामुळे हे वीजे खांब, तारा तुटण्याचा धोका वाढला आहे. या तारा तुटून पडल्यास शाळेच्या आवारात विद्यूत प्रवाह उतरण्याचा धोका आहे. यातून काही अनुचित प्रकार घडल्यास पालक संबंधीत शाळेला आणि जिल्हा परिषदेला जबाबदार धरतील.

 

यामुळे जिल्हा परिषदेने दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील हे धोकादायक वीज खांब, उच्च दाब वीज तारा आणि रोहित्र हलवण्याचा ठराव केला आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी हे सर्व शाळेच्या परिसातून हलवण्याची मागणी केली आहे. या विषयावर शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे गेल्या अनेक दिवसांपासन आक्रमक आहेत. शिक्षण समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत महावितरणने तातडीने कार्यवाही करत शाळेच्या आवारातील हे धोकादाय खांब, रोहीत्र अन्यत्र हलवण्याची मागणी केली आहे.

 

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 ली ते 8 वीपर्यंत 3 हजार 599 शाळा आहेत. सध्य स्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात 72 ठिकाणी वीज रोहित्र आहेत. 163 ठिकाणी शाळाच्या परिसारातून इमारती जवळून वीजेच्या तारा गेलेल्या आहेत. तर शाळेच्या परिसारात 386 ठिकाणी वीजेचे खांब आहेत. हे बसवतांना वीज वितरण कंपनीने जिल्हा परिषदेची परवानगी घेतलेली नाही. यामुळे वीजेचे खांब, तारा आणि रोहित्र शाळेच्या आवारात ठेवण्याचा अधिकार नसल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले आहे.

 

यासह जिल्हा परिषदेच्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पाणी योजनांना देखील वीज वितरण कंपनीने व्यवसायिक दराऐवजी कृषी दराने विज दर लागू करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्र या नफा कमवणार्‍या संस्था सेवा देणार्‍या संस्था आहेत. यामुळे या ठिकाणी वीजेचा दर आकारणी कृषी दराने करण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*