वाघापूर ग्रामपंचायतचे 5 सदस्य निलंबित

0
अकोले (प्रतिनिधी) – कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी वाघापुर ग्रामपंचायत चे सरपंच भाऊसाहेब लक्ष्मण लांडे, उपसरपंच रोहिणी संजय औटी, सदस्य भाऊसाहेब रखमा लांडे, सिमा दत्तु लांडे व अशोक नाना वामन यांचे निलंबन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी केलेल्या चौकशी अहवालावरून ही कारवाई करण्यात आली.
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी उपरोक्त पाचही सदस्यांवर कलम 39(2) नुसार निलंबनाचे पत्र पाठविले आहे. या सदस्यांच्या निलंबनाचे कारण असे की वाघापूर गावच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मालकीचे जमिन गट नं. 24, 165, 268 ची मोजणी करून त्यामधील अतिक्रमाणे काढावीत असा ठराव दि. 15-8-2015 रोजीच्या ग्रामसभेत झाला होता.
त्यानुसार ग्रामपंचायत ने मोजणीसाठी दि. 9-9-2015 रोजी भूमी अभिलेख, अकोले यांचेकडे रितसर फि भरून मोजणीची मागणी केली. त्यानुसार भूमि अभिलेख कार्यालयाने दि. 26-4-2017 रोजी मोजणी करून जागेच्या हद्दी ठरवुन दिल्या. या हद्दीनुसार सरपंच भाऊसाहेब रखमा लांडे, सदस्य भाऊसाहेब लक्ष्मण लांडे व सिमा दत्तु लांडे यांनी अतिक्रमण केल्याचे उघड झाले.
मात्र सदर जागेची मोजणी होऊ नये यासाठी सरपंच व सदस्य यांनी दि. 18-5-2016 रोजी मासिक सभा घेऊन ग्रामसभेत घेतला गेलेला ठराव रद्द करण्याचा ठराव केला व प्रत्यक्ष मोजणीप्रसंगी गैरहजर राहिले. या कारणावरून सरपंच, उपसरपंच व तिन सदस्य यांनी कर्तव्यात कसुर केल्याचे निष्पन्न झाले असल्याचा अहवाल वाघापूर ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे.
सदर कार्यवाहीसाठी व गावच्या कल्याणासाठी ग्रा.पं. सदस्या सौ. मंदा गणपत बराते यांनी या गोष्टीचा चांगला पाठपुरावा केला. या पाठपुराव्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, जि.प.सदस्य डॉ.किरण लहामटे, जालिंदर वाकचौरे तसेच मच्छिंद्र मंडलिक शिवाजीराजे धुमाळ, .सुनिताताई भांगरे, रमेश राक्षे, सोनाली नाईकवाडी, भाऊसाहेब वाकचौरे, दत्ता बोर्हाडे, दत्ता देशमुख, उर्मिला राऊत, अलका अवसरकर आदींनी बराते यांचे अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

*