46 हजार भारतीयांना मिळाले अमेरिकेचे नागरिकत्व

0

ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2016 दरम्यान सुमारे 46 हजार 100 भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले असून अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणार्‍यामध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

तर मॅक्सिको नेहमीप्रमाणे पहिल्या स्थानावर आहे.

याबाबची आकडेवारी यूएस डिपार्टमेण्ट ऑफ माईलँड सिक्युरिटीने जाहीर केली असून त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 2016 च्या आर्थिक वर्षात (1 ऑक्टोबर 2015 ते 30 सप्टेंबर 2016) इतर देशांच्या नागरिकांना देण्यात आलेल्या नागरिकत्वाच्या यादीमध्ये 6 टक्के भारतीय नागरिकांचा समावेश होता.

एकूण सात लाख लोकांमध्ये जवळपास 46 हजार भारतीय होते.

2016 च्या आर्थिक वर्षात अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी 9 लाख 72 हजार अर्ज आले होते. यात मागील वर्षाच्या तुलनेत 24 टक्के वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

*