शासन निर्णय रद्द करा : राहुरी तालुका शिक्षक समन्वय समितीची मागणी

0

बदल्यासंदर्भात अन्याय 

राहुरी स्टेशन (वार्ताहर)– प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासंदर्भातील 27 फेब्रुवारी 2017 रोजीचा शासननिर्णय अत्यंत संदिग्ध, गुंतागुंतीचा व अन्यायकारक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होणार असल्याने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा शासन निर्णय राज्य शासनाने तत्काळ रद्द करावा, अशी आग्रही मागणी राहुरी तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात नायब तहसीलदारांना समन्वय समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले, यापूर्वीचा सन 2014 चा बदल्यासंदर्भातील शासन निर्णयाचा अवलंब करावा, विनंती बदल्यांसाठी कोणत्याही प्रकारची टक्केवारीची अट ठेवू नये, सर्व प्रकारच्या बदल्या समुपदेशनाने कराव्यात, सरल संगणक प्रणालीचा वापर टाळावा, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती यांना पूर्वीप्रमाणे बदल्यांचे अधिकार देण्यात यावेत, एकल प्राथमिक शिक्षकांचा बदली प्रक्रियेत सहानुभूतीपूर्वक विचार केला जावा, पती-पत्नीला 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बदल्या देण्यात येऊ नयेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी रवींद्र अरगडे, संजय कुलकर्णी, रवीकिरण साळवे, मच्छिंद्र तरटे, अनिल विधाते, साळूभाऊ नरवाडे, उमेश मेहेत्रे, भारती शेळके, छाया तुपे, संपत सोनवणे, मारूती साबळे, मनोज ओहोळ, राहुल लोंढे, सोन्याबापू आंबेकर, अनिल कोल्हापुरे, अनिल पवार, प्रभू बाचकर, संजय तेलोरे, देवेन्द्र विघ्ने, हरिभाऊ हाके, विठ्ठल बर्डे, रेवन्नाथ कोळसे, नाना रुपनर, संपत तमनर, किशोर नवले, संतोष गिरगुणे, शिवाजी नवाळे, निलकंठ बोनेकर, शिवाजी वाघ, महेश अवसरकर, संदीप ससाणे, किशोर मिस्किन, रमेश देंडगे, अरविंद शिंदे, अशोक शेळके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*