43 झेडपी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीने बदल्या

0

15 परिचर कनिष्ठ सहाय्यक पदावर 

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याच मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेमधील 43 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहे. यामध्ये 15 शिपाई कनिष्ठ सहाय्यक पदावर गेले.
दरवर्षीप्रमाणे मे महिना जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा बदली हंगाम कालावधी म्हणून ओळखला जातो. त्यानुसार शिक्षक वगळता सर्व संवर्गातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

जिल्ह्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद मुख्यालय ते थेट ग्रामपंचायत स्तरावर सेवेत असणार्‍या बदलीपात्र कर्मचार्‍यांच्या नजरा बदल्याकडे असतात. मात्र, प्रशासनाला सर्वांच्या सोईप्रमाणे बदली शक्य नसल्याने कर्मचार्‍यांना नाराजीला सामोरे जाऊन पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागते.

त्यामुळे नेहमी बदली प्रक्रियेदरम्यान कर्मचार्‍यांमध्ये कभी खुशी कभी गम असते. बदलीप्रकियेत कक्ष अधिकारी-2,अधीक्षक-9, वरिष्ठ सहाय्यक-17, कनिष्ठ सहाय्यक-15 आदी एकूण 43 कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या.

LEAVE A REPLY

*