4 मिनिटे सायकल चालवा आणि फिट राहा!

0

वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या तयार होतात, त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठीही सायकल चालवणं फायद्याचं ठरतं. एका संशोधनातून हे समोर आले आहे.

सायकलिंग त्या सेल्सना रोखून ठेवतो, ज्यांमुळे वाढतं वय चेहऱ्यावर प्रकर्षाने जाणवत नाही. संशोधकांच्या माहितीनुसार, अनेकजणांचा असा समज असतो की लाँग बाईक राईड म्हणजेच जास्तीत जास्त अंतर सायकल चालवल्यास चांगला व्यायाम होतो. मात्र, अमेरिकेतील एका संशोधनातील माहितीनुसार, एका आठवड्यात 12 वेळा केवळ 4 मिनिटं सायकलिंग करणं म्हणजे ट्रेडमिलवर 90 मिनिटांपर्यंत वॉक करण्यासारखं आहे.

संशोधक 4 मिनिट सायकलिंगबाबत काय सांगतात? : मायो क्लिनिकच्या संशोधकांच्या माहितीनुसार, शॉर्ट बर्स्ट एक्सरसाईजमुळे शरीर तंदुरुस्त होतं. लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते आणि डायबीटिजपासून दूर राहण्यासही सायकलिंगची मदत होते.

संशोधन कसं केलं? : 18 ते 30 वयोगट आणि 65 ते 80 वयोगटातील 72 महिला आणि पुरुषांचा समावेश या संशोधनादरम्यान सर्वेक्षणात करण्यात आला. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींकडून हाय-इंटेसिटी ट्रेनिंगपासून वेट ट्रेनिंग, कंबाईन ट्रेनिंगसारख्या गोष्टी करवून घेतल्या.

LEAVE A REPLY

*