4 कोटींचा प्रकल्प 20 कोटींवर …

0

कोल्हापूर / पुनर्वसनासाठी शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतल्याने आप्पाचीवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प अधिक खर्चिक होत चालला आहे.

सुधारित निधी अभावी हे काम पुन्हा रखडल्याने या भागाचा पाणीप्रश्न गंभीर होत आहे. गेल्या 9 वर्षात 4 कोटींचा प्रकल्प 20 कोटी 54 लाखांवर गेला आहे.

मिणचे खोरीच्या दुर्गम डोंगराळ भागातील आप्पाचीवाडी येथे 2007 साली जलसंधारण विभागाने या प्रकल्पासाठी मंजुरी दिली.

27.57 मीटर उंची, 3 मीटर रुंदी, 365 मीटर लांबी व साठवण क्षमता 1389 घन मीटर, सांडवा 35 मीटर व कालवा 4 किमी आणि लाभक्षेत्र 155 हेक्टर असे वर्णन असलेल्या या प्रकल्पाचा खर्च 4 कोटी 20 लाख रुपये होता.

हा निधी जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केला. पुनर्वसनाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित होता त्यामुळे गेली 9 वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले.

पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्यानंतर फेब—ुवारी 2016 ला पुन्हा काम सुरू झाले. मात्र जेवढा निधी मिळाला तेवढे काम झाल्याचे संबंधित खात्याचे म्हणणे आहे.

उर्वरित कामासाठी सुधारित अंदाजपत्रक 20 कोटी 54 लाख रुपये करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या 9 वर्षात 4 कोटींचा प्रकल्प 20 कोटी 54 लाखांवर गेला आहे.

पाटबंधारे खात्याने याबाबतचा सुधारित निधीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवला आहे.

एवढा मोठा निधी उपलब्ध होईपर्यंत पुढील काम पूर्णत: थांबवणार आहे.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

*