३६ लाख रुपयांचा अपहार लेखापरिक्षणात उघड; देवळा पोलिसांत गुन्हा दाखल

0
भऊर (वार्ताहर) | देवळा तालुक्यातील खारीपाडा येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव व संचालक मंडळातील सात सदस्यांनी संगनमतिने प्राप्त अधिकाराचा गैरवापर करून बोगस व खोट्या पावतीच्या आधारे ३६ लाख ६२ हजार ८५६ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले आहे.

याबाबतची माहिती, माहीती सहाय्यक निबंधक संजय गीते यांनी दिली आहे. तशा आशयाची फिर्याद नवनाथ अर्जुन बोडके (लेखापरीक्षक सहकारी संस्था देवळा ) यांनी देवळा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

फिर्यादित म्हटले आहे की, तालुक्यातील खारीपाडा येथील अरुणोदय खारीपाडा विविध कार्यकारी सोसायटीत १-४- २०१४ ते ३१-३- २०१६ ह्या मुदतीचे वैधानिक लेखा परीक्षण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नासिक यांनी सहकारी संस्थाच्या ऑनलाईन लेखा परीक्षण वाटप व्यवस्थेनुसार व त्यांचे कडील आदेश दुरूस्ती आदेशाने परंतुक अन्वये लेखापरीक्षण केले असता अपहार झाल्याचे आढळून आले.

यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सोसायटीच्या कर्जदार सभासदांनी पाणीटंचाई, पुनरर्चना, साधे अल्प, मध्यम मुदत आदीच्या कर्जापोटी भरणा केलेली रक्कम वसुली रजिष्टर व रोजकिर्दीत जमा न करता कर्जदाराच्या वैयक्तिक खतावणीस जमा रकमेच्या खोट्या नोंदी करून कर्ज खतावणीमधील येणे कर्जबाकी परस्पर कमी करून २६ लाख १५ हजार ०२९ रुपयांचा तात्कालीन तात्कालीन सचिव दत्तात्रेय शंकर आहिरेयांनी अपहार केला आहे. कर्जदारांना खोटया / बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणुक केली.

संचालक मंडळातील सात संचालकांनी सचिवाशी संगनमत करून व अधिकाराचा गैरवापर करून स्वतःची कर्जे निर्लेखित करणेसाठी बनावट व खोटया पावत्या तयार करून रोजकीर्दीस रक्कम जमा नसतांना खोट्या पावतीच्या कर्ज खतावणीतील १० लाख ४७ हजार ८२७ रुपये एवढ्या रकमेची स्वत:ची कर्जे अधिकाराचा गैरवापर करून रकमेचा अपहार केला आहे.

सोसायटीचे तात्कालीन सचिव दत्तात्रेय शंकर आहिरे, तात्कालीन संचालक हिरामण गोविंद आहेर, दादाजी धोंडु गांगुर्डे, गोरख खंडु गांगुर्डे, धनंजय देविदास जाधव, दौलत कृष्णा पगारे, गणेश धनंजय जाधव, शिवाजी सुखदेव कुंभार्डे
या सात संचालकावर देवळा पोलिस ठाण्यात फसवणुक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

*