31 ऑक्टोबर आधी गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, IT टेक्नॉलॉजीचा आधार घेणार : मुख्यमंत्री

0

“31 ऑक्टोबर आधी गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. ही इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी असेल. यावर अभ्यास करण्यासाठी 4 महिन्यांचा वेळ घेण्यात आला आहे.”, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“मागच्या काळात कर्जमाफीसाठी घोटाळा झाला आहे, तो होऊ नये म्हणून IT बेस्ड टेक्नॉलॉजीचा आधार घेणार आहोत.”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जे ख-या अर्थाने शेतकऱ्यांचे नेते आहेत, त्यांच्याशीच चर्चा होऊ शकते असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
तसंच हिंसक घटनांमागे कोणता पक्ष आहे याची माहिती आहे असे सांगत पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी किसान क्रांती समन्वय समितीने जिल्ह्यात सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.
सोमवारी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर मंगळवारी शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकून शेतकऱ्यांच्या भावना प्रशासन व शासनापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

*