268 कोटींचे अंदाजपत्रक सादर

0

धुळे / स्थायी समितीने अकरा तरतुदी अंदाजपत्रकात सूचविल्या असून आवश्यक ती वाढ व घट करुन 268 कोटींचे अंदाजपत्रक महापौर सौ.कल्पना महाले यांच्याकडे स्थायी सभापती कैलास चौधरी यांनी सादर केले.

महापालिकेचे सन 2017-18 चे प्रशासनाने 241 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते.

त्यानंतर स्थायी समितीने दि.30 मार्च रोजी घेतलेल्या सभेत अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली.

सदस्यांनी केलेल्या सूचना व शहर विकासाचा विचार करुन अंदाजपत्रकाला स्थायीत मंजूरी देण्यात आली.

अंदाजपत्रकात आवश्यक ती वाढ व घट करुन 268 कोटींचे अंदाजपत्रक स्थायीने मंजूर केले. यात अकरा तरतुदी सूचविण्यात आल्या.

अकरा तरतुदी
महापालिकेच्या स्थायी समितीने अकरा तरतूदी अंदाजपत्रकात सुचविल्या असून त्यात शहर विकासासाठी नगरसेवक निधी प्रत्येकी 20 लाख असावा, मनपाच्या हद्दीत प्रवेशव्दार उभारण्यात यावे, केंद्र व राज्य स्तरातील स्पर्धा परिक्षांसाठी अभ्यासिका बांधण्यात यावी, अमरधाम येथे विद्युत व डिझेल शव दाहिनीची सुविधा करावी, अमरधाम व दफनभुमीचे सुशोभिकरण करण्यात यावा, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिम राबवावी,महापौर केसारकुस्ती स्पर्धा घेण्यात याव्यात, राष्ट्रीय खेळाडू व कलावंतांचा सत्कार करण्यात यावा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावेत, बायोगॅस प्रकल्प शहरात उभारण्यात यावा, शहरातील विविध चौकांचे सुशोभिकरण करण्यात यावे या तरतुदींचा समावेश आहे.

स्थायी समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी 268 कोटींचे अंदाजपत्रक आज महापौर सौ.कल्पना महाले यांना सादर केले. यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव, स्थायी सदस्य ईस्माईल पठाण, गुलाब माळी आदी उपस्थित होते.
30 एप्रिलपर्यंत महासभेत अंदाजपत्रक मंजूर झाले पाहिजे होते, परंतु मेचा पहिला आठवडा उलटत असतांना देखील महासभेत अंदाजपत्रक मंजूर झाले नाही. आज स्थायी सभापती चौधरी यांनी महापौरांकडे अंदाजपत्रक सादर केले आहे. आता लवकरच अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी महासभा होईल.

 

LEAVE A REPLY

*