25 हजार 991 विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण; अकरावी प्रवेशात कोणतीही अडचण नाही

0
नाशिक। नाशिक महापालिका आणि देवळाली कंटक मंडळ भागातील अकरावी प्रवेशासाठी यंदा प्रथमच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी एकूण 29 हजार 480 माहितीपुस्तिका विकल्या गेल्या होत्या. त्यापैकी 28 हजार 989 विद्यार्थ्यांनी भाग एक पूर्ण भरला तर त्यापैकी 25 हजार 991 विद्यार्थ्यांनी भाग दोन भरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.

प्रवेश घेवून इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयाने दोन दिवस मुदतवाढ दिली होती. त्यानुसार गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांनी केले.

अकरावीसाठी प्रवेशासाठी मंगळवार दिनांक 27 जून संध्याकाळपर्यंत भाग एकचे 28 हजार 904 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले. त्यापैकी 25 हजार 91 अर्जांंची पडताळणी झाली तर 3 हजार 3 हजार 327 अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली. भाग दोनमध्ये 25 हजार 352 अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली.

त्यापैकी 25 हजार 264 अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आली. दरम्यान सोमवारी संध्याकाळपर्यंत 28 हजार 324 विद्यार्थ्यांनी भाग एक भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यापैकी 24 हजार 205 विद्यार्थ्यांनी भाग दोन भरण्याची प्रक्रियाही पूर्ण केली होती. यातील काही विद्यार्थ्यांनी भाग एकची पडताळणी करून न घेताच भाग दोन भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना अडचणी आल्या.

दरम्यान विविध कारणांमुळे जे विद्यार्थी अद्यापही ऑनलाईन प्रवेश करू शकलेले नाहीत त्यांना 29 जूनपावेतो संध्याकाळी 5 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ देण्यात आल्यानंतर त्याचा लाभ सुमारे 50 हून अधिक विद्यार्थ्यांना झाला. प्रथमच केंद्रीय स्तराव प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आलेली असली तरी कोणत्याही प्रकारची अडचण याप्रक्रियेत आलेली नाही असे उपसंचालक कार्यालयाकडून तथा केंद्रीय प्रवेश समितीकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*