20 आरोपींविरोधात 2800 पानांचे दोषारोपपत्र

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील पांगरमल दारुकांडात बनावट दारुमुळे नऊ जणांचा बळी गेला होता. याप्रकरणी 20 आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. शुक्रवार (दि.11) 2 हजार 800 पानांचे दोषारोपपत्र नाशिकचे विशेष न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या समोर दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी लवकरात लवकर सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

 

मंगळवारी (दि.1) पांगरमल घटनेतील सर्व आरोपी नाशिकच्या मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात मोहन दुग्गल, सोनू दुग्गल व याकुब शेख या तिघांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अन्य 10 आरोपींची 16 पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणात आणखीन तपास करण्यासाठी पोलीसांना 11 ऑगस्टपर्यंत दोषारोपपत्र दाखल करण्याची मूदत देण्यात आली होती. आज तपासी अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक दिलीप नवकुडकर यांनी आवश्यक तो तपास करुन अप्पर पोलीस महासंचालक दिलीप नवकुडकर न्यायाधीश शर्मा यांच्यासमोर दोेषारोपपत्र दाखल केले आहे.

 

 

19 फेब्रुवारी 2017 ला निवडणुकीच्या प्रचारात पार्टीत बनावट दारुमुळे 9 जणांना मुत्युला सामोरे जावे लागले होते. या घटनेचा तपास केला असता चक्क धक्कादायक महिती उघड झाली होती. ही बनावट दारू जिल्हा रूग्णालयातील कॅन्टीनमध्येच तयार होत असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी मिथेनॉलसह अन्य महत्वाचे पुरावे हस्तगत केले होते. त्यानंतर जीतू गंभीर, जाकीर शेख, मोहन दुग्गल यांच्यासह 17 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच दारु घेण्यासाठी पैसे पुरविणार्‍या पंचायत समितीच्या सदस्या मंगला आव्हाड व जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

 

 

याप्रकरणी पोलिसांनी 17 जणांना अटक केली असून भाग्यश्री मोकटे व सुरजितसिंग गंभीर ही दोघे अद्याप फरार आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी हा तपास सीआयडीसकडे वर्ग करण्यात आला होता. या दरम्यान जाकीर कादर शेख (रा. तारकपुर), जीतू उर्फ जगजितसिंग किसनसिंग गंभीर, मोहन दुग्गल, सोनु दुग्गल व याकुब शेख (रा.सिंधी कॉलनी, तारकपुर), हमीद अली शेख, वैभव उर्फ शेखर जयसिंग जाधव (पाईपलाईनरोड), दादा उर्फ प्रविण भालचंद्र वाणी (रा. धुळे), जिल्हा परिषदेच्या सदस्या भाग्यश्री मोकाटे, सुरजितसिंग गंभीर (रा. तारकपुर) शिवसेना जिल्हा उप्रमुख भिमराज गेणू आव्हाड, भरत रमेश जोशी (सिव्हील हाडको), पंचायत समितीच्या सदस्या मंगला आव्हाड (रा. पांगरमल), गोविंद मोकाटे (रा. इमामपुर), महादेव किसन आव्हाड (रा. पांगरमल), रावसाहेब गेणू आव्हाड, अमित वासुमन मोतीयानी (रा. नाईक हॉस्पिटल), अजित उर्फ नन्ह्या गुलराज सेवानी (रा. नवलेनगर), नवनाथ बबन धाडगे (रा. माळीवाडा) मयत राजु बुगे (रा. शिवजीनगर) अशा 20 जणांवर शनिवारी (दि.11) दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

 

 

 मयताची देखील   चौकशी होणार 

पांगरमल घटनेत मयत राजू बुगे यांच्यावर देखील दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याचे नाव या गुन्ह्यात सामाविष्ठ आहे. त्याचा गुन्ह्यातील सहभाग काय आहे. त्याने या घटनेदरम्यान मालमत्ता कमविली आहे का? अशा अनेक गोष्टींसाठी चौकशी करणे आहे. यामुळे बुगे मयत झाला असला तरी त्याचे गुन्ह्यातून नाव वगळण्यात येणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*