1 जुलैपासून मतदार यादी दुरुस्ती मोहिम

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील 3 हजार 599 मतदान केंद्रावर शनिवार 1 जुलैपासून मतदार यादी विशेष दुरुस्ती मोहिम राबविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

तालुकानिहाय नियुक्त मतदार नोंदणी अधिकारी यांना सदर मोहिम राबविण्यासर्ंभात लेखी आदेश देण्यात आले आहेत.सर्व मतदान केंद्रावर मतदाद केंद्रस्तरीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येवून त्यांच्याकडे आवश्यक ते फॉर्म देण्यात येणार आहे.

संबधित अधिकार्‍यांनी केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबरोबरच मतदारांच्या घरो-घरी जाणे अपेक्षित आहे. मोहिमेचे 1 जुलै रोजी औपचारीक सुरवात करुन भारत निवडणूक आयोगाच्या धोरणानुसार कोणताही मतदार सुटु नये.याची काळजी घेण्याबाबत सूचित करर्‍यात आले आहे.मोहिमेचे संनियंत्रण व्यवस्थित होण्यासाठी तालुक्यातील विविध विभागातील प्रमुख अधिकार्‍यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

19 हजार मतदार वगळले –
जिल्ह्यात गेल्या 6 महिन्यात दुबार,स्थलांतरीत,मयत अशी एकूण 19 हजार 965 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.यामध्ये पारनेर, संगमनेर, अकोले व नेवासा तालुक्यामधील सर्वाधिक मतदार वगळले आहेत.

10 हजार मतदार वाढले – 
जिल्ह्यात 6 महिन्यात 10 हजार 692 मतदार वाढले आहेत. संगमनेर, पारनेर, शेवगावचा समावेश आहे.तर, 16 हजार 965 मतदारांचे फाटो प्राप्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

*