1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाडा न्यायालायात आज निकाल!

0

मुंबईतील 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी शेवटच्या खटल्यातील सात आरोपी दोषी आहेत की नाही, याबाबत विशेष टाडा न्यायालाय आज निकाल देणार आहे.

12 मार्च रोजी  झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला.

या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप निश्चित केले असून ते दोषी आहेत की नाही, हे विशेष टाडा न्यायालय आज स्पष्ट करणार आहे.

LEAVE A REPLY

*