Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 19:31:39 hrs

नाशिक
माझे मत | इतर बातम्या | क्राईम | कृषी | प्रादेशिक | पुरवणी | सदर | बातमी-चित्र
मुख्य पान | नाशिक | पिस्तूल, काडतुसासह एकास अटक
पिस्तूल, काडतुसासह एकास अटक
मनमाड(30-July-2010)
Tags : Nashik,Regional
 

मनमाड, दि.29 (प्रतिनिधी) - मनमाड रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे सुरक्षा बलाने धनराज विनोद झामरे याला विदेशी पिस्तूल व 35 जिवंत काडतुसांसह अटक केली. तो खरगोन येथून पिस्तूल आणि काडतूस घेऊन नाशिक येथे एका व्यक्तीला देण्यासाठी येत होता. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. तो नाशिकच्या क्लासिक असोसिएट या बांधकाम कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. तिचे काम मध्य प्रदेशातील खरगोन येथे सुरू असल्याने त्याला पाठविण्यात आले होते. तिथे त्याची स्थानिक लोकांशी ओळख झाली. नाशिकला जात असल्याचे कळाल्यानंतर काही लोकांनी तुला 20 हजार रुपये देऊ तू पिस्तूल आणि काडतूस आम्ही सांगू त्या व्यक्तीस दे, असे सांगितले. 20 हजार रुपये मिळणार म्हणून लालसेपोटी धनराज पिस्तूल आणि काडतुसे घेऊन आला. रेल्वेस्थानकात जात असताना ब्रिजच्या जवळ स्कॅन मशीन लावलेली आहे तेथे सुरक्षा बलाने त्याला बॅग स्कॅन मशीनवर ठेवण्यास सांगितले. त्याने बॅग ठेवल्यानंतर त्यात पिस्तूल आणि काडतुसे दिसताच जवानांनी त्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.


प्रिंट काढा