कुर्ला : कसाईवाडा येथे बिल्डिंग कोसळली, 1 ठार
मुंबई - कुर्ल्यामधील कसाईवाडा (कुरेशीनगर) परिसरात असलेली चार मजली निवासी इमारत काल मध्यरात्री कोसळली. यात एका पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत.तसेच ढिगार्याखाली अनेक जण अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.