मनपा हद्दीत स्थानिक संस्थाकरासह वॅट आणि आयकर चूकविणार्या व्यापार्यावर यापुढे सेल्स टॅक्स व मनपा यांची संयुक्तीक करडी नजर राहणार आहे. कर चुकविणार्या विरोधात सेल्स टॅक्सच्या अधिकार्यांनी आयुक्त रामनाथ सोनवणे यांची भेट घेवून याबाबत सहकार्य करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.
शहरात मनपातर्फे आकारण्यात येणार्या स्थानिक संस्था कर(एलबीटी) भरण्यास काही व्यापारी सहकार्य करत नसल्याने मनपाचे आर्थिक नियोजन विस्काळीत झाले आहे. महापालिकेकडे आतापर्यत 6हजार 700 व्यापार्यांनी नोंदणी केली आहे. मात्र त्यातील केवळ 2 हजार 700 व्यापारीच स्थानिक संस्था कराचा भरणा करीत आहे. उर्वरीत व्यापार्यांनी कर भरावा यासाठी आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेत शहराती व्यापार्यांकडे कागदपत्र तपासणीची मोहीम सुरू केलीे आहे. सेल्स टॅक्स विभागाने दखल घेत मनपाकडून व्यापार्यांची माहीती घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,दोन्ही संस्थांना कर हवा असल्याने सेल्स टॅक्स विभागाचे अधिकारी श्री.अग्रवाल आणि त्यांच्या सहकारी अधिकार्यांनी आयुक्त रामनाथ सोनवणे यांची भेट घेतली. या भेटीत कर चूकविणार्या व्यापार्या ंसर्ंभात प्राप्त माहीतीची देवाण-घेवाण करून संबधीतांकडून कर वसुल करावा व त्यांच्या वर करडी नजर ठेवावी या संदर्भात चर्चा होवून कर वसुलीसाठी सेल्स टॅक्स विभागाने मनपा कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यावरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, याबाबत आयुक्त सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.
|