Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 19:17:23 hrs

अहमदनगर
माझे मत | इतर बातम्या | क्राईम | कृषी | प्रादेशिक | पुरवणी | सदर | बातमी-चित्र
मुख्य पान | अहमदनगर | धान्य वाया घालवणे हा गंभीर गुन्हा!
धान्य वाया घालवणे हा गंभीर गुन्हा!
नवी दिल्ली, दि.28 (वृत्तसंस्था)-(29-July-2010)
Tags : Ahmednagar,Maharashtra
 

उपासमारीला तोंड देणार्‍या भारतासारख्या देशात धान्याचा एक दाणाही वाया घालवणे हा गुन्हा असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार्‍यांवर केंद्र सरकारने कडक कारवाई करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केली. अनेक लोक उपाशी मरत असताना, अन्नाचा एक दाणाही वाया घालवणे हा मोठा गुन्हा आहे आणि देशात अनेक ठिकाणी अन्नधान्याची नासाडी होत असल्याचे सरकारच्या निवेदनांतूनच स्पष्ट झाले आहे, असे न्यायमूर्ती दलवीर भंडारी आणि न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या खंडपीठाने नमूद केले. सरकारने दीर्घकालीन विचार करून पुरेशी कोठारे तसेच साठवणीच्या सुविधा विकसित कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली. तातडीचा उपाय म्हणून सरकारने गोदामे भाड्याने घेण्याचाही विचार करावा. मात्र, सरकारचे प्राधान्य धान्य वाचविण्यालाच असले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती वाधवा समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, प्रत्येक टप्प्यावर धान्याची चोरी होत आहे.


प्रिंट काढा