|
| डोसाला 7 ऑगस्टपर्यंत कोठडी |
|
| मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) (29-July-2010) |
Tags : Ahmednagar,Crime,Maharashtra |
- आर्थर रोड कारागृहात असलेल्या डॉन अबू सालेमवर चमच्याने वार करणारा दाऊद टोळीतील गुंड मुस्तफा डोसा आणि त्याचा साथीदार अब्दुल कय्युम शेख यांना 7 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गेल्या शनिवारी सकाळी न्याहारीवेळी डोसाने चमच्याच्या साह्याने सालेमवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सालेम जखमी झाला. त्याच्यावर कारागृहातच उपचार करण्यात आले. या हल्ल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात डोसा आणि त्याचा साथीदार शेख यांना बुधवारी फोर्टमधील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने हा आदेश दिला. या हल्ल्याचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने एका पथकाची नियुक्ती केली आहे. 17 वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात डोसा आरोपी आहे. त्याचा ताबा मिळविण्यासाठी टाडा न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते. याकरिता पोलिसांनी विशेष न्या. एस. टी. महाजन यांच्यापुढे डोसाचा ताबा मिळविण्यासाठी अर्ज केला. न्यायालयाने डोसाच्या ताब्याला संमती देऊन त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते. |
प्रिंट काढा |
|
|
|