Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 10:45:13 hrs

मुख्य पान | महाराष्ट्र | सांगलीत ‘स्वाइन’चा पहिला बळी
सांगलीत ‘स्वाइन’चा पहिला बळी
सांगली, दि. 28 (प्रतिनिधी) (29-July-2010)
Tags : Ahmednagar,Maharashtra
 

- जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा पहिला बळी गेला. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील अंजली मधुकर पवार (वय 27) असे त्यांचे नाव आहे. अंजली या तापाने आजारी होत्या. उपचारासाठी त्यांना भारती इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह मिळाला. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू करण्यात आले. मात्र, अखेर त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. स्वाइन फ्लूची बाधा इतरांना होऊ नये म्हणून आगळगाव व कुची गावच्या लोकांवर आवश्यक ते उपचार सुरू करण्यात आले आहेत. काही संशयितांवरही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे नऊ बळी गेले होते. यावर्षीही सहा जणांवर उपचार करण्यात आले. त्यांचा पुण्या-मुंबईशी संपर्क राहिल्याचे दिसून आले. सध्या पावसाळी वातावरणामुळे स्वाइन फ्लू साथीला अनुकूल स्थिती आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णसंपर्कात आलेल्या 1200 जणांना आतार्पंत टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत.


प्रिंट काढा