Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 20:04:07 hrs

मुख्य पान | राजकीय | माजी आ. कुंजीर, जगताप कॉंग्रेसमधून निलंबित
माजी आ. कुंजीर, जगताप कॉंग्रेसमधून निलंबित
पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) (29-July-2010)
Tags : Ahmednagar,Political,Maharashtra
 

- जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून कॉंग्रेस भवनात मंगळवारी झालेल्या राड्याला जबाबदार पुरंदरचे माजी नगराध्यक्ष संजय जगताप आणि ज्यांना राड्यात प्रसाद मिळाला ते माजी आ.संभाजी कुंजीर या दोघांनाही 6 वर्षांसाठी कॉंग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले. कॉंग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाच्या खुर्चीवरून येथील कॉंग्रेस भवनात मंगळवारी राडा झाला. खुर्च्यांचा धोपाटण्यासारखा वापर आणि लाथाबुक्क्यांनी यथेच्छ धुलाईमुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या चव्हाट्यावर आल्या. या प्रकारानंतर विद्यमान जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी यांचीच जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया माजी आमदार आणि पक्षाच्या शिस्तभंग कारवाई समिती अध्यक्ष अनंतराव थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी कॉंग्रेस भवनात झाली. त्यात नव्या जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येणार होते. त्यावेळी पुरंदर भागातील कॉंग्रेस नेते संजय जगताप यांचे कार्यकर्ते बैठकीत शिरले. माजी आ.संभाजी कुंजीर यांच्याशी त्यांचा वाद सुरू झाला. वाद वाढत गेला आणि मुद्द्याची जागा गुद्द्यांनी घेतली. जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्या उचलून कुंजीर यांना मारहाण केली. त्यांच्यावर लाथाबुक्क्यांचाही वर्षाव केला. पुरंदर भागातील माजी आ. चंदूकाका जगताप आणि कुंजीर यांच्यातील राजकीय वैर जुने आणि सर्वश्रुत आहे. संजय हे चंदूकाकांचे पुत्र. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती. या प्रकरणाची प्रदेश कॉंग्रेसने गंभीर दखल घेत राडा करणार्‍या या दोन्ही नेत्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.


प्रिंट काढा