|
| राष्ट्रकुल ठरणार प्रेरणादायी |
|
| नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) (29-July-2010) |
Tags : Ahmednagar,Sports |
- भारतात 3 ते 14 ऑक्टोबर 2010 दरम्यान दिल्ली येथे राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धा दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार असून या मैदानात 75 हजार प्रेक्षकांना बसण्याची क्षमता आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा भारतात प्रथमच होणार असल्याने यामुळे युवा खेळाडूंना खूप प्रेरणा मिळणार आहे.
दिल्ली येथील या मैदानात ऍथलेटिक्स, लॉन बॉल, वेटलिफ्ंिटग यासारख्या स्पर्धा होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा भारतात प्रथमच होत आहेत. तर आशिया खंडात दुसर्यांदा होत आहेत. याआधी 1998 मध्ये मलेशियाची राजधानी कुआलालंपूर येथे या स्पर्धेच आयोजन झाले होते. 1951 आणि 1982 च्या आशियाई स्पर्धांच्या आयोजनानंतर देशात प्रथमच विश्वस्तरावरील स्पर्धेचे आयोजन होत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात पावसाचे अडथळे येत असल्यामुळे नेहरू मैदानाचे काम अजूनही अपूर्ण आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|