|
| मॅराडोनाची हकालपट्टी |
|
| ब्यूनस आयर्स, दि. 28 (वृत्तसंस्था) (29-July-2010) |
Tags : Ahmednagar,International,Sports |
- विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न उराशी घेऊन आलेल्या अर्जेंटिना संघाचा प्रशिक्षक मॅराडोनाची अर्जेंटिना फुटबॉल संघाने हकालपट्टी केली. विश्वविजेतेपद जिंकूनच परतू, असे आश्वासन एफएला देणारा मॅराडोना यांचा संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाल्याने फुटबॉल विश्वात त्यांची खूपच नामुष्की झाली. आज बुधवारी मॅराडोना आणि एफएचे (अर्जेंटिना फुटबॉल संघ) अध्यक्ष ज्यूलिया ग्रोडोना यांच्यात तणावपूर्वक झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 49 वर्षीय मॅराडोना यांना हकालपट्टीने मोठा धक्का बसला आहे. आज झालेल्या बैठकीत ज्यूलिया ग्रोडोना यांनी मॅराडोनापुढे काही महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. यात मॅराडोना यांना पूर्णत: त्यांच्या चुका दाखविण्यात आल्या, तसेच मॅराडोना यांच्या कारकिर्दीतील गेले 18 महिने चढउताराचे ठरले. त्याच्या प्रशिक्षणाखाली संघ विश्वस्पर्धेत सहभागी झाला. मात्र, उपांत्यपूर्व फेरीतच त्यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला. आता एफएपुढे मॅराडोना यांच्या जागेवर 55 वर्षीय अलेजांद्रो साबेलो यांचा पर्याय आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी एस्टुडियांटेस स्पर्धेत संघाने चमकदार कामगिरी केली होती. मात्र, सध्या सर्जिया बतिस्ता यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते अर्जेंटिना अंडर 20 संघाचे प्रशिक्षक आहेत. 11 ऑगस्टपासून डबलिन येथे सुरू होणार्या आयरलँडविरुद्धच्या मैत्री सामन्यात ते प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. |
प्रिंट काढा |
|
|
|