|
| लंकेला सचिन-विरूचे चोख उत्तर |
|
| कोलंबो, दि. 28 (वृत्तसंस्था) (29-July-2010) |
Tags : Ahmednagar,International,Sports |
- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेने उभारलेल्या धावांच्या डोंगरासमोर तिसर्या दिवसाअखेर 4 गडी गमावीत 382 धावा केल्या. भारताच्या या धावसंख्येत वीरेंद्र सेहवाग (99), मुरली विजय (58), सुरेश रैना (नाबाद 66) यांच्या अर्धशतकांचा मोलाचा वाटा होता. या सामन्यात भारत अजूनही 260 धावांनी पिछाडीवर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात 4 गड्यांच्या मोबदल्यात 642 धावा केल्या आहेत. आज (बुधवार) सामन्याच्या तिसर्या दिवशी वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय यांनी सावध सुरुवात करीत श्रीलंकेला यश मिळू दिले नाही. श्रीलंकेविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागचे शतक अवघ्या एक धावेने हुकले. त्याला सलग दुसर्या सामन्यात शतक झळकाविण्याची संधी होती. सेहवागला फिरकी गोलंदाज रणदीवने बाद केले. दीडशतकी सलामी देणार्या भारताची सेहवाग बाद झाल्यानंतर पडझड झाली. सेहवागच्या शतकापासून एक धाव दूर असताना रणदीवच्या फिरकीवर चेंडू उंचावरून मारण्याचा नादात तो चकला आणि यष्टीचीत झाला. त्याने 101 चेंडूत 99 धावांची खेळी केली. जेवणापर्यंत भारताच्या 3 बाद 173 धावा झाल्या होत्या. सेहवागच्या शतकापासून एक धाव दूर असताना रणदीवच्या फिरकीवर चेंडू उंचावरून मारण्याच्या नादात तो चुकला आणि यष्टिचीत झाला. यानंतर मुरली विजय आणि राहुल द्रविड हे झटपट बाद झाले. यानंतर लक्ष्मणही कमाल दाखवू शकला नाही. त्याला मेंडिसने 29 धावांवर पायचीत बाद केले. सचिन आणि रैनाने नंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश मिळू न देता 141 धावांची नाबाद भागीदारी केली. दिवसाअखेर सचिन 108 आणि रैना 66 धावांवर खेळत आहेत.
विक्रमवीर
विक्रमांचा बादशहा असणार्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात शतक झळकविले. सचिनचे हे कसोटी कारकिर्दीतील 48 वे शतक असून, तो शतकांच्या अर्धशतकापासून दोन पावले (शतके) दूर आहे. सचिनने आतापर्यंत 168 कसोटी सामन्यांत 13 हजार 638 धावा केल्या आहेत. सचिनवर संघाला गरज असताना खेळत नसल्याची कायम टीका करण्यात येत असते. भारतावर फॉलोऑनचे सावट असताना सचिनने केलेल्या या शतकाने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सचिनने आजपर्यंत अनेक विक्रम करीत क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटविला आहे. सचिनच्या याच कामगिरीचे कौतुक जगभरात झाले असून, या शतकाने तो पुन्हा एकदा कौतुकास पात्र आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|