Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 18:50:00 hrs

नाशिक
माझे मत | इतर बातम्या | क्राईम | कृषी | प्रादेशिक | पुरवणी | सदर | बातमी-चित्र
मुख्य पान | नाशिक | जिल्हा बँक चेअरमनची मुदत अडीच वर्षे करण्याचा ठराव
जिल्हा बँक चेअरमनची मुदत अडीच वर्षे करण्याचा ठराव
Nasik(29-July-2010)
Tags : Nashik,Regional
 

नाशिक, दि. 28 (प्रतिनिधी) - वैद्यनाथन समितीच्या शिफारशीनुसार उपविधीस काल जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. संचालक मंडळ 29 वरून 26 करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे बँकेचे चेअरमनपद एक वर्षावरून अडीच वर्ष करण्यास उपस्थित संचालक मंडळाने तसेच सभासदांनी अनुकूलता दर्शविली. या उपविधीमुळे दरवर्षी बँकेच्या चेअरमनपदासाठी होणारा घोडेबाजार थांबून चेअरमनपदाला स्थैर्य लाभेल, असे मत व्यक्त केले. तर मालेगाव, कळवण, बागलाण आदी तालुक्यातील सभासदांनी व संचालकांनी चेअरमनपद वर्षाचेच ठेवावे असे सांगताच काही संचालकांनी सभासदांच्या भावनांचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. या गोंधळातच चेअरमनपदास अडीच वर्ष मुदतवाढ देण्याबाबत ठराव करून तो विभागीय सहनिबंधकांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सभेनंतर सूत्रांनी दिली. जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी शासनाने तयार केलेल्या उपविधीच्या मंजुरीसाठीच बोलविण्यात आली होती. जिल्हा बँकेकडून उपविधी मंजूर करण्यास आधीच विलंब झाल्याचे सांगण्यात येते. त्यातच बँकेच्या प्रगतीसाठी तसेच स्थैर्यासाठी चेअरमनपद हे एक वर्षाऐवजी अडीच वर्षाचे करण्याची सूचना इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील सभासदांनी मांडली. त्यावरून सभेत गोंधळ झाला. ज्येष्ठ पत्रकार पा.भां करजंकर यांनी चेअरमनपदाचा कार्यकाळ एक वर्षाचाच असावा, असे नाबार्डने सुचवले असले तरी सहकार आयुक्तांनी कार्यकाळ अडीच वर्षापर्यंत मंजूर करण्यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव झाल्यास त्यानुसार मुदतवाढ देता येत असल्याचे स्पष्ट केले. तसेच बँकेच्या प्रगतीविषयीही कौतुकोद्गार काढले. सभेत मुदतवाढीच्या बाजूने व विरोधात अशी मते संचालक मंडळ तसेच सभासदांनीही मांडली. शेवटी उपविधी मंजूर करण्यात आला. चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी मुदतवाढ अडीच वर्षाची करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे सत्ताधारी संचालकांनी सांगितले. तर सभेनंतर एका विरोधी संचालकांने सांगितले की महापौरपद व जिल्हा परिषद अध्यक्षपदाप्रमाणेच जिल्हा बँकेचे चेअरमनपद अडीच वर्षाचे ठेवल्यास पदाला स्थिरता लाभून बँकेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास सोपे जाऊन दरवर्षीे होणारा चेअरमन पदासाठीचा घोडेबाजारही थांबणार आहे. काठावर असलेल्या संचालकांचे दरवर्षी होणार्‍या चेअरमनपदाच्या निवडीमुळे लाखोेंचे भांडवल जमा होते. त्यांना बँकेच्या स्थैर्याशी आणि प्रगतीशी काहीही घेणे देणे नसते. तर अन्य एका संचालकाने मुदतवाढीसाठी अडीच वर्षाचा कार्यकाळ केल्यास अन्य संचालक त्यास विरोध करतील, प्रत्येक संचालकाचे बँकेचे चेअरमन होण्याचे स्वप्न असते. त्यामुळे अडीच वर्षाच्या मुदतवाढीला असे संचालक विरोध करून तसा अर्ज विभागीय सहनिबंधकांकडे देतील, असे सांगितले.


प्रिंट काढा