नाशिक, दि.28 (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील काही केरोसीन विक्रेते 13 ऐवजी 15 रुपयांनी केरोसीनची विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अशांवर गुप्तपणे नजर ठेऊन त्यांचे परवाने निलंबित करण्यात येणार असल्याचे समजते. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब दांगडे व धान्य पुरवठा अधिकारी व्ही.एन.शिंदे यांना दरांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना करून कारवाई करण्याचे आदेश
दिले आहेत.