Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 10:23:32 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | पुणे पोलिसांची ‘सत्य’ कामगिरी
पुणे पोलिसांची ‘सत्य’ कामगिरी
Pune(29-July-2010)
Tags : News,National,Maharashtra
 

पुणे, दि. 28 (विशेष प्रतिनिधी) - माकड म्हणते माझीच लाल, या ग्राम्य म्हणीची आठवण येईल, अशा स्वरुपाचे एक शपथपत्र पुणे पोलीस आयुक्तालयाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यात म्हटले आहे की, जून 2009 ते 2010 या काळात भारतीय फौजदारी दंडसंहितेच्या कलम 302, 376, 394, 395 या कलमान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या घटली असून, गुन्ह्यांचा तपास अत्यंत समाधानकारक लावला गेलेला आहे. तसेच गुन्हेगारांना शिक्षाही मोठ्या प्रमाणात ठोठावली गेली आहे आणि हे यश महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्तालयांपेक्षा उत्तम असे आहे. मुंबईपेक्षा पुण्याचे कार्यक्षेत्र दुप्पट असूनही मुंबईत 46 हजार पोलीस आहेत तर पुण्यात फक्त 8 हजार पोलीस आहेत, तरीही हे यश पुणे पोलिसांनी मिळवले आहे. या शपथपत्रात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातल्या अन्य महानगरांची तुलना करता नोंदविले गेलेले गुन्हे सतत घटत आहेत. सर्वोत्तम गुन्हा अन्वेषणाचा पुरस्कार पुणे पोलिस आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी गेल्या 3 वर्षात 13 वेळेला मिळवलेला आहे. बलात्कार, दरोडे, खून, याचे नोंदवले गेलेले गुन्हे शोधून काढून गुन्हेगारांना अटक करण्यात व त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात, राज्यात अग्रेसर राहण्याची कामगिरी पुणे पोलीस आयुक्तालयाने बजावली आहे ती अन्य कोणत्याही आयुक्तालयाला बजावता आलेली नाही. मुंबईचे क्षेत्रफल 437 चौरस किलोमीटर आहे तर पुण्याचे क्षेत्रफळ 743 चौ.की.मी. आहे. मुंबईतील रस्त्यांची लांबी 1931 कि.मी. आहे तर पुण्याच्या रस्त्यांची लांबी 3333 कि.मी. आहे तरीही मुंबईच्या दिमतीला 46 हजार पोलीस आहेत तर पुण्याच्या दिमतीला अवघे 8 हजार पोलीस आहेत, याचा अर्थ क्षेत्रफळ दुप्पट आणि पोलीस दल मात्र 1 षष्ठांश एवढेच. अशी स्थिती असतांना सुद्धा हे यश पुणे पोलिसांनी प्राप्त केले आहे. गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक घटतो आहे, या अहवालावर उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले आहे. ही माहिती पुणे पोलीस आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) ए.डी.शिंदे यांनी दिली आहे. परंतु सर्वसामान्य पुणेकरांची मात्र हा अहवाल वाचून चांगलीच करमणूक झाली. गुन्हा घडू नये अशी जरब समाजात निर्माण करणे हे पोलिसांचे कार्य आहे. त्यामुळे गुन्हे घडणे आणि शोधून काढणे यात हुशारकी कसली? तसेच गेल्या काही महिन्यात पुण्यात झालेले बलात्कार, खून अगदी


प्रिंट काढा