|
| आषाढी, गुरुपौणिर्र्मेला एस.टी.ला 96 लाख |
|
| Nasik(29-July-2010) |
Tags : Nashik,Regional |
नाशिक, दि.28 (प्रतिनिधी) - राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे पंढरपूर येथे आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त पुरविण्यात आलेल्या वाहतूकसेवेतून एस.टी.ला 96 लाख 65 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे विभाग नियंत्रक के.बी. देशमुख यांनी सांगितले.
पंढरीच्या वारीसाठी प्रत्येक तालुक्यातून 210 बसगाड्या सोडल्या होत्या. त्यांनी 1221 फेर्यांमधून 1 लाख 16 हजार प्रवाशांची वाहतूक केली, तर 4 लाख 33 हजार कि.मी.चा प्रवास केला. याशिवाय गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीसह त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गड येथे जाणार्या भाविकांची संख्या लक्षात घेता यंदा महामंडळाने या तीनही ठिकाणांसाठी 92 जादा बसगाड्या सोडल्या. त्यातून 7 लाखांचे उत्पन्न मिळाले. |
प्रिंट काढा |
|
|
|