श्रीरामपूर (प्रतिनिधी) - सुरळीत खताचे वाटप करण्यात येईल असे कृषी विस्तार अधिकार्यांना सांगितल्यानंतर व सायंकाळी 7 वाजेपर्यंत थांबूनही खत न मिळाल्याने काल पंचायत समितीच्या प्रांगणात शेतकरी व तालुका कृषी अधिकार्यांना राज्य मराठा विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेराओ घातला.