|
| द्विशतकाने संगकाराची गरूड भरारी |
|
| कोलंबो, दि. 27 (वृत्तसंस्था)(28-July-2010) |
Tags : Ahmednagar,Sports |
- श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकारा क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक बनविणार्या खेळाडूंच्या यादीत तिसर्या स्थानावर विराजमान झाला आहे. संगकाराने भारताविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यादरम्यान 219 धावा केल्याने त्याला हे शिखर गाठणे शक्य झाले आहे. संगकाराचे हे या वर्षीचे सातवे द्विशतक ठरले, तसेच तो कसोटीत सर्वाधिक द्विशतक करणार्यांच्या यादीत इंग्लंडचा माजी कसोटीपटू वाली हेमंडसह संयुक्तपणे तिसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. हेमंडने 85 सामन्यांत सात द्विशतक ठोकले होते, तर कुमारने कसोटीतील 90 व्या सामन्यात ही बरोबरी साधली. यासह संगकारा श्रीलंकेतील सर्वाधिक द्विशतक ठोकणारा खेळाडूही ठरला आहे. याआधी मार्वन अट्टापट्टू आणि माहेला जयवर्धनेने सहा वेळा द्विशतक ठोकले आहेत. आज सामन्याच्या दुसर्या दिवशी 130 धावांपासून पुढे खेळताना 304 चेंडूत 27 चौकारांच्या मदतीने सातवे द्विशतक पूर्ण केले. यासह श्रीलंकेच्या या कर्णधाराने माहेलासह तिसर्या गड्यासाठी 193 धावा जोडून नवा विक्रम केला. या दोघांमध्ये ही 12 वी शतकीय भागीदारी ठरली. याआधी अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिस्लिवा यांनी 11 वेळा शतकी भागीदारी रचल्या होत्या. |
प्रिंट काढा |
|
|
|